सी-वोटरच्या सर्व्हेमध्ये आता लोकसभा निवडणुका झाल्या तर राज्यात भाजपा प्रणित एनडीएच्या जागा कमी होतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याच सर्व्हेनंतर राज्यात वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारदेखील जनतेला बदल अपेक्षित आहे, असे म्हणाले आहेत. यावरच आता शिंदे गटातील नेते शहाजीबापू वाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच आगामी काळात पंतप्रधानपदाच्या खुर्चीला भाजपाचे नेते नितीन गडकरी न्याय देऊ शकतील, असेही शहाजीबापू पाटील म्हणाले आहेत. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

हेही वाचा >>> धीरेंद्र कृष्ण शास्त्रींच्या तुकाराम महाराजां वादग्रस्त विधानानंतर सुप्रिया सुळे संतापल्या; म्हणाल्या “आपण…”

BJP manifesto 2024 Sankalp Patra continuity amid change
भाजपाच्या जाहीरनाम्यात नवीन काय? कुठले मुद्दे वगळले? कशाबाबत मौन?
Ahmednagar, Shirdi, election, sujay vikhe patil,
नगर, शिर्डीमध्ये गेल्या निवडणुकीतील प्रतिस्पर्धी यंदा एकत्र
thane lok sabha marathi news, thane bjp sanjay kelkar marathi news
ठाण्यात भाजपच्या जुन्या-नव्यांमध्ये रस्सीखेच
Lok Sabha polls West Bengal elections
ममतादीदी आणि भाजपा आमनेसामने; एनआयएवरील हल्ल्याचं नेमकं प्रकरण काय?

वंचित-ठाकरे गटातील युतीमुळे महाविकास आघाडीमध्ये तणाव निर्माण होईल

जनता बदलाची अपेक्षा करत आहे, असे शरद पवार म्हणाले आहेत. पवारांच्या याच विधानावर बोलताना “शरद पवार यांचे मत मला मान्य नाही. मी सध्या महाराष्ट्रात फिरत आहे. भारतीय जनता पार्टी तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारभाराविषयी सर्वसामान्य जनता मला समाधानी दिसत आहे. ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील युती राष्ट्रवादी आणि काँग्रेसला न आवडणारी आहे. त्यामुळे या युतीमुळे महाविकास आघाडीमध्ये तणाव निर्माण होईल. या युतीमुळे शिंदे गटाला कोणताही फटका बसणार नाही,” असे शहाजीबापू पाटील म्हणाले.

हेही वाचा >>> धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचे संत तुकाराम महाराजांविषयी आक्षेपार्ह विधान; म्हणाले “त्यांची पत्नी…”

खुर्चीला न्याय देण्याची शक्ती आणि क्षमता नितीन गडकरी यांच्यात आहे

मराठी चेहरा म्हणून नितीन गडकरी हे पंतप्रधानपदी पाहायला आवडतील का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर बोलताना, “आज नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व देशात तसेच आंतरराष्ट्रीय राजकारणात सर्वोच्च पदावर पोहोचले आहे. अशा परिस्थितीत अजूनही नरेंद्र मोदी यांचीच गरज आहे. पण भविष्यात कधीतरी या खुर्चीला न्याय देण्याची शक्ती आणि क्षमता नितीन गडकरी यांच्यात आहे,” असे शहाजीबापू पाटील म्हणाले.

हेही वाचा >>> शरद पवारांवर टीका करताना गुणरत्न सदावर्तेंनी पातळी सोडली, आजाराचा उल्लेख करत म्हणाले, “तोंडाला…”

ते तत्व सोडून युती करण्यास तयार आहेत

“सध्याच्या परिस्थितीत अचानकपणे सत्ता गेल्यानंतर महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांची अडचण निर्माण झाली आहे. येणाऱ्या निवडणुकीला कसे सामोरे जायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर असून यासाठी ते वेगवेगळ्या लोकांशी युती करण्यास तयार आहेत. अनेक ठिकाणी ते तत्व सोडून युती करण्यास तयार आहेत,” अशी टीकाही शहाजीबापू पाटील यांनी केली.