कराड : कोकणामध्ये काल उद्धव ठाकरे यांची शिमगा सभा झाली. उद्धवजींचे आतापर्यंतच्या भाषणातील सगळ्यात दर्जा घसरलेलं भाषण सगळ्यांना पहायला मिळाले. त्यांच्याकडून इतक्या खालच्या थराच्या भाषणाची अपेक्षा महाराष्ट्राला नव्हती. त्यांनी जीभ हसडण्याची भाषा केली. पण, त्याच्या पुढच्या गोष्टी हसडण्याची ताकद आमच्यामध्ये असल्याचा हल्लाबोल राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी माध्यमांशी बोलताना केला.
शंभूराज पुढे म्हणाले, की उद्धव ठाकरेंसोबत आम्ही गेल्यावर्षी पर्यंत काम केले होते, अशाप्रकारचे त्यांचे वक्तव्य हे महाराष्ट्रातल्या सामान्य लोकांची, शिवसैनिकांची घोर निराशा करणारे आहे. विशेषतः शिवसेनेचे मुख्य नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर येऊन जे वक्तव्य केल त्याचा मी जाहीर शब्दामध्ये निषेध करतो. नम्रपणाने उद्धवजींना मी एवढचं सांगतो त्यांच्यापेक्षा पुढच्या भाषेमध्ये आम्हाला उत्तर देता येत. त्यांनाच बोलता येत असे नाही आम्हालाही बोलता येते असे जणू आव्हान देताना, पण मुखमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला पहिल्यादिवसापासून सांगितलेल आहे की आपण संयम सोडायचा नाही. परंतु, आमच्या संयमाचा आता अंत झालेला आहे. आजवर उधाव ठाकरेंचे अन्य लोक बोलत होते. आम्ही दुर्लक्ष करत होतो. पण, आता ज्यांना बाळासाहेब ठाकरेंचा कौटुंबिक वारसा आहे वंदनीय बाळासाहेब ठाकरेसाहेबांचे ते सुपुत्र आहेत. त्यांनी अशा पद्धतीने जीभ हासडण्याची भाषा करणे याला आमचे नेते रामदास कदम यांनी आजच उत्तर दिलेले आहे. आणि त्याचा मी साक्षीदार असल्याचे मंत्री देसाई यांनी सांगितले.