scorecardresearch

Premium

सातारा: जिल्हा रुग्णालयातील प्रश्नावरून साताऱ्यात शंभूराज देसाई संतप्त

देसाईंच्या यापुढील पत्रकार परिषदांवर साताऱ्यातील पत्रकारांचा बहिष्कार

shamburaje desai
शंभूराज देसाई

वाई: जिल्हा रुग्णालयाशी संबंधित विचारलेल्या प्रश्नावरून साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई संतप्त झाले. यामुळे साताऱ्यातील पत्रकारांनी देसाई यांच्या यापुढील पत्रकार परिषदांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. शंभूराज देसाई यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद आयोजित केली होती. जिल्हा रुग्णालयाशी संबंधित पत्रकार परिषद असल्याने जिल्हा आरोग्य यंत्रणेवरून पत्रकारांनी पालकमंत्र्यांना चांगलेच धारेवर धरले. त्यामुळे पालकमंत्री संतप्त झाले. यातून पत्रकारांसोबत त्यांचा शाब्दिक वादही झाला.

जिल्हा रुग्णालयातील अव्यवस्था, रुग्णांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा उपलब्ध न होणे, औषध पुरवठा, अपुरी डॉक्टर आणि कर्मचारी संख्या, जिल्हा रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता, तुंबलेली ड्रेनेज व्यवस्था, परिसरातील दुर्गंधी आदी अनेक बाबी पत्रकारांनी देसाई यांच्या निदर्शनास आणल्या. सातारा जिल्हा रुग्णालयात कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी काय दक्षता घेतली आदी अनेक प्रश्न विचारण्यात आले. पत्रकारांनी प्रश्नांचा भडिमार केला तेव्हा तुम्ही नकारात्मक विचार करू नका, असे सांगून वेळ मारून नेली. मात्र पत्रकारांनी प्रश्न सुरू ठेवल्यावर देसाई संतप्त झाले. यामुळे साताऱ्यातील पत्रकारांनी देसाई यांच्या यापुढील पत्रकार परिषदांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.

Advocate Prashant Bhushan
“सर्वोच्च न्यायालयातील एक तृतीयांश न्यायाधीश चांगले, इतर…”, ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांचा आरोप
Elderly activist commits suicide in CPI(M) office in Solapur
सोलापुरात माकप कार्यालयात वृध्द कार्यकर्त्याची आत्महत्या
pune mahavikas aghadi marathi news, inauguration of water tank at gokhalenagar marathi news
पुणे : अजित पवारांच्या आधीच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केले उद्घाटन; काही काळ तणावाचे वातावरण
The mystery of firing on the motor vehicle inspector increased Nagpur
मोटार वाहन निरीक्षकावरील गोळीबाराचे गुढ वाढले

हेही वाचा >>> “आत्मक्लेश करण्यासाठी आता यशवंतराव चव्हाणांच्या छायाचित्रासमोर बसा!”, रोहित पवार यांची अजित पवार यांच्यावर टीका

प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांशीच त्यांनी  हुज्जत घातली. पत्रकारांनाच आपला प्रश्न अपुऱ्या माहितीच्या आधारे आहे असा प्रतिप्रश्न केला. तसेच आपल्या प्रश्नाला उत्तर द्यायला मी बांधिल नाही असे उत्तरही त्यांनी दिले. याचवेळी त्‍यांनी शासकिय रुग्णालयात औषधे मिळत नसल्‍यास थेट जिल्‍हाधिकाऱ्यांनाच फोन करा असा फतवा काढला. शंभूराज देसाई यांनी पालकमंत्री पद मिळाल्यापासून पत्रकार परिषदां वाढल्या आहेत. यामध्ये आपल्याला आवश्यक आहे तेवढीच माहिती देणे आणि पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे न देणे.

हेही वाचा >>> सातारा : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीही कंत्राटी पद्धतीने भरा : प्रकाश आंबेडकर

पत्रकार परिषदेला वेळेवर न पोहचणे, वेळांमध्ये सतत बदल करणे पत्रकारांना वाट पहायला लावने असे त्यांचे प्रकार घडत होते.याबाबत त्यांना पत्रकारांनी अवगत केले होते. त्यांच्यात  काहीच फरक पडला नाही. त्यामुळे यापुढे त्यांच्या पत्रकार परिषदांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय सातारा जिल्हा पत्रकार संघाने घेतला आहे. साताऱ्यात या विषयी आयोजित बैठकीला जेष्ठ पत्रकार शरद काटकर, जिल्हाध्यक्ष हरिष पाटणे, सातारा शहर अध्यक्ष विनोद कुलकर्णी, दीपक प्रभावळकर, दीपक शिंदे, सुजित आंबेकर, विद्या म्हासूर्णेकर, राहुल तपासे डिजिटल मीडियाचे सनी शिंदे,दत्ता मर्ढेकर आदी उपस्थित होते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shambhuraje desai angry in satara over the question in the district hospital ysh

First published on: 07-10-2023 at 23:15 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×