scorecardresearch

Premium

“शरद पवारांना आजकाल उद्धव ठाकरे यांची फारच चिंता, त्यामुळेच…”, शंभुराजे देसाईंचा जोरदार हल्लाबोल

शंभूराज देसाई यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली.

Sharad Pawar Uddhav Thackeray Shambhuraje Desai
शरद पवार, उद्धव ठाकरे, शंभुराजे देसाई

राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली. “शरद पवारांना आजकाल उद्धव ठाकरेंची फारच चिंता लागली आहे, असं आम्हाला वाटतं,” असं म्हणत शंभुराजेंनी टोला लगावला. तसेच पवारांचं ऐकल्यामुळेच शिवसेनेची, विशेषतः उद्धव ठाकरे गटाची आज ही अवस्था झाली आहे, अशी टीका केली. देसाई आज (२१ सप्टेंबर) पंढरपूर येथे शिवसेनेतील शिंदे गटाच्या हिंदू गर्व गर्जना मेळाव्यास आले होते. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.

शंभूराज देसाई म्हणाले, “शरद पवारांना आजकाल उद्धव ठाकरे यांची फारच चिंता लागली आहे, असं आम्हाला वाटतं. आमचं सर्वांचं म्हणणं आहे की, पवारांचं जास्त ऐकल्यामुळेच शिवसेनेची, विशेषतः उद्धव ठाकरे गटाची ही अवस्था झाली आहे.”

jayant patil on chandrashekhar bavankule, jayant patil criticize chandrashekhar bavankule, invitation given to rahul gandhi to come baramati
“…तर बावनकुळेंना दारोदारी का फिरावे लागत आहे?”, जयंत पाटील यांचा टोला
jaykumar gore and jayant patil
जिहे-कठापूरच्या टेंडरवरून राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आ. जयकुमार गोरेंचा हल्लाबोल ; जयंत पाटील यांना खुले आव्हान
devendra fadnavis sharad pawar
राष्ट्रपती राजवटीवरून देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट, शरद पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “भाजपाकडं बहुमत होतं, तर…”
Eknath Shinde Rishi Sunak Uddhav Thackeray
ऋषी सुनक यांचं नाव घेत एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंच्या संपत्तीबाबत गौप्यस्फोट, म्हणाले, “ते लंडनला…”

“ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल पाहिले, तर शिवसेना उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात चौथ्या पाचव्या क्रमांकावर फेकली गेली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी याचा विचार करायला हवा. शरद पवार असं का बोलत आहेत? असं बोलण्यामागे त्यांचा उद्देश काय आहे?” असा सवाल शंभुराजेंनी विचारला.

“बाळासाहेबांच्या विचाराचं सोनं लुटण्याचा अधिकार फक्त आम्हालाच, कारण…”

शंभुराजे देसाई पुढे म्हणाले, “वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांचं सोनं लुटण्याचा अधिकार आम्हालाच आहे. कारण केवळ राज्यातील सत्तेसाठी, मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या विचारांवरील नैसर्गिक सेना भाजपाची युती सोडली आणि काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत अनैसर्गिक युती केली होती. ते महाराष्ट्रातील जनतेलाही मान्य नव्हतं.”

हेही वाचा : “…तर आम्हीपण तुमच्या गटात येतो” ठाकरे गटातील आमदारांच्या रात्रीच्या फोनबाबत शहाजीबापू पाटलांचा गौप्यस्फोट

“कालच्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पहिल्या क्रमांकावर आहे,” असंही शंभुराजे देसाईंनी नमूद केलं.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shambhuraje desai criticize sharad pawar over caring uddhav thackeray shivsena rno news pbs

First published on: 21-09-2022 at 12:40 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×