राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचं सोन लुटण्याचा अधिकार आम्हालाच असल्याचं वक्तव्य केलं आहे. तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचं ऐकल्यामुळेच शिवसेनेची, विशेषतः उद्धव ठाकरे गटाची आज ही अवस्था झाली आहे, अशी टीका केली. मंत्री देसाई आज (२१ सप्टेंबर) पंढरपूर येथे शिवसेनेतील शिंदे गटाच्या हिंदू गर्व गर्जना मेळाव्यास आले होते. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.

शंभूराज देसाई म्हणाले, “शरद पवारांना आजकाल उद्धव ठाकरे यांची फारच चिंता लागली आहे, असं आम्हाला वाटतं. आमचं सर्वांचं म्हणणं आहे की, पवारांचं जास्त ऐकल्यामुळेच शिवसेनेची, विशेषतः उद्धव ठाकरे गटाची ही अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल पाहिले, तर शिवसेना उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात चौथ्या पाचव्या क्रमांकावर फेकली गेली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी याचा विचार करायला हवा.”

Ramdas Athawale, raj thackeray
“महायुतीला राज ठाकरेंच्या पाठिंब्याची गरज नव्हती, मात्र…”, रामदास आठवले यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
Loksatta chavdi happening in maharashtra politic news on maharashtra politics
चावडी: तो मी नव्हेच!
Arvind Kejriwal Arrest
अरविंद केजरीवाल यांच्या आधी किती मुख्यमंत्र्यांना अटक झाली? राजीनामा देणं किती आवश्यक? कायदा काय सांगतो?
pankaja munde
मोले घातले लढाया: ‘जनतेच्या मनातील मुख्यमंत्र्यां’ची रवानगी दिल्लीत !

“बाळासाहेबांच्या विचाराचं सोनं लुटण्याचा अधिकार फक्त आम्हालाच, कारण…”

“शरद पवार असं का बोलत आहेत? असं बोलण्यामागे त्यांचा उद्देश काय आहे? वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांचं सोनं लुटण्याचा अधिकार आम्हालाच आहे. कारण केवळ राज्यातील सत्तेसाठी, मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या विचारांवरील नैसर्गिक सेना भाजपाची युती सोडली आणि काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत अनैसर्गिक युती केली होती. ते महाराष्ट्रातील जनतेलाही मान्य नव्हतं,” असं मत शंभुराजे देसाई यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा : दसरा मेळाव्यापूर्वी उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार; गटप्रमुखांच्या मेळाव्यात चालणार ‘बाण’!

“कालच्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पहिल्या क्रमांकावर आहे,” असंही शंभुराजे देसाईंनी नमूद केलं.