नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत देशात इंडिया आघाडीने भाजपाप्रणित एनडीएसमोर मोठं आव्हान निर्माण केलं. एनडीएने बहुमत मिळवलं असलं तरी इंडिया आघाडीने तब्बल २३५ जागांपर्यंत मजल मारली. महाराष्ट्रात महाविकास आघाडीने (इंडिया) महायुतीवर (एनडीए) मात केली. मविआने राज्यातील ४८ पैकी ३१ जागा जिंकल्या तर महायुतीला केवळ १७ जागांवर विजय मिळाला. महाराष्ट्रात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि ज्येष्ठ नेते शरद पवार (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार) यांनी महायुतीसमोर तगडं आव्हान निर्माण केलं. पक्ष फुटल्यानंतर ही निवडणूक ठाकरे आणि पवारांसाठी अस्तित्वाची लढाई बनली होती. मात्र या दोन्ही नेत्यांनी सर्व दावे आणि एक्झिट पोल खोटे ठरवत दमदार पुनरागमन केलं. उद्धव ठाकरेंच्या पक्षाने राज्यात नऊ तर शरद पवारांच्या पक्षाने आठ जागा जिंकल्या. दरम्यान, हे दोन्ही नेते आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागले आहेत.

उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी त्यांच्या पक्षातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. शरद पवारांनी तर आत्तापासूनच दौऱ्यांना सुरुवात केली आहे. पवारांनी वेगवेगळ्या गावांमधील शेतकरी आणि ग्रामस्थांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. दरम्यान, इंदापूर दौऱ्यावेळी शरद पवार यांनी शेतकरी आणि ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी पवार ग्रामस्थांना म्हणाले, “चार-सहा महिने थांबा, मला राज्यातलं सरकार बदलायचं आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांना रस्त्यावर उतरावं लागेल.”

Eknath Shinde, Mahatma Gandhi Mission Hospital, accident, Mumbai Pune Expressway, Ashadhi ekadashi, patient treatment, government support,
मुख्यमंत्र्यांकडून जखमी वारकऱ्यांची विचारपूस
anil parab slams maharashtra government for not transfering dditional bmc commissioner sudhakar shinde
विरोधकांकडून आरोपांची राळसत्ताधाऱ्यांना पैसे गोळा करून देण्यासाठीच सुधाकर शिंदे पदावर- अनिल परब
Case, Special Public Prosecutor,
माजी आमदाराच्या तक्रारीवरून विशेष सरकारी अभियोक्त्याविरोधात गुन्हा, १० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप
aditya thackeray replied to ashish shelar
तेजस ठाकरेंचा ‘त्या’ व्हिडीओवरून आशिष शेलारांची टीका; आदित्य ठाकरेंनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले…
principal, vehicle, female employees,
मानसिक त्रास देण्यासाठी प्राचार्यांनी दिले महिला कर्मचाऱ्यांच्या वाहनातील हवा सोडण्याचे आदेश, प्राचार्यांच्या अजब प्रतापाविरोधात….
Criticism of Eknath Shinde government regarding Rabindra Waikar investigation closed by the ed print politics news
खासदार वायकर यांना अभय; विरोधकांची टीका; सोमय्या कुठे गेले, काँग्रेसचा सवाल
“…तर दगडालाही शेंदूर फासून लढण्याची तयार ठेवा,” खासदार अरविंद सावंत यांचे शिवसैनिकांना आवाहन; म्हणाले, “मातोश्रीचे आदेश…”
Ajit pawar and sunetra pawar
“दादा तर कामं करतात, आता वहिनींकडून…”, राज्यसभेत निवडून आल्यानंतर सुनेत्रा पवारांच्या समर्थकांच्या अपेक्षा काय?

शरद पवार यांनी आज पुरंदर तालुक्याच्या कोळविहिरे येथे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, तुम्ही चार-सहा महिने थांबा, मला राज्य सरकार बदलायचं आहे. हे सरकार बदलल्याशिवाय आपल्याला शेतकऱ्यांसाठी हवी तशी धोरणं राबवता येत नाहीत. सरकार बदलल्यावर आपण शेतकऱ्यांसाठी कामं करू.

शरद पवारांचे दौरे सुरू

शरद पवार म्हणाले, गेले पाच-सहा दिवस राज्यातल्या काही भागांमध्ये एक वेगळं चित्र दिसत होतं. राज्य सरकारनेसुद्धा काही गावं, काही तालुके हे दुष्काळी म्हणून जाहीर केलेले आहेत आणि साधारणत: त्याच्यामध्ये ज्यांचा उल्लेख होता, त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुका हा अग्रभागी होता. तेव्हाच मी ठरवलं एखादा दिवस काढायचा आणि काही गावांना जाऊन भेटी द्यायच्या व येणाऱ्या संकटांपासून लोकांची सुटका करण्यासाठी तातडीने काय उपाययोजना करायची? आणि दुसऱ्या बाजूने कायमचा प्रश्न सोडवण्यासाठी दीर्घ स्वरूपाचे काय कार्यक्रम हातामध्ये घेता येतील? त्याची माहिती लोकांकडून घ्यायची आणि त्याच दृष्टीने मी या ठिकाणी आलो.

हे ही वाचा >> “मोहन भागवत एक वर्षानंतर बोलले, हेही काही कमी नाही”, उद्धव ठाकरेंचा सरसंघचालकांना टोला!

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा म्हणाले, गेल्या दोन-तीन दिवसात वातावरण पूर्णपणे बदललं आहे, पण समाधानकारक नाही. पीकं येतील, अशी स्थिती नाही, चाऱ्याचा प्रश्न सुटला आहे अशी स्थिती या ठिकाणी नाही आणि तुमच्याकडून माहिती घेणे आणि राज्य सरकारशी बोलून मुख्यमंत्री व त्यांच्या सहकाऱ्यांची एक संयुक्त बैठक घेऊन या प्रश्नांची सोडवणूक करण्याची जबाबदारी घ्यावी हा आजच्या भेटीचा माझा उद्देश होता.