सातारा: ‘लाडक्या बहिणी’च्या नावे योजना आणल्या परंतु त्यापेक्षा महिलांना संरक्षण हवे होते. ते संरक्षण देण्यात हे सरकार कमी पडल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी वाई येथे केली. वाई-खंडाळा- महाबळेश्वर मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या (शरद पवार) उमेदवार अरुणादेवी पिसाळ यांच्या प्रचारार्थ सभेत ते बोलत होते.

पवार म्हणाले, की ‘लाडकी बहीण’ ही योजना जरी लोकप्रिय झाली असली तरी ती केवळ मते मिळवण्यासाठी आणलेली आहे. मतांसाठी लाडक्या बहिणीची आठवण करणाऱ्या राज्य सरकारला महिला संरक्षणाची काळजी नाही. राज्यात यांच्या काळात ६७ हजार ३८१ महिलांवर, मुलींवर अत्याचार झाले. ६४ हजार महिला व मुली बेपत्ता झाल्या. त्यामुळे राज्य सरकार महिलांच्या सुरक्षेबाबत गंभीर नाही. यांना लाडक्या बहिणींची नाही तर सत्तेची चिंता आहे. लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसल्याने त्यांनी लाडकी बहीण योजना आणली आहे. महिला सन्मानाचे राज्याचे आजपर्यंत शेकडो वर्षाचे सूत्र असताना, या सरकारने महिलांच्या संरक्षणाबाबत काहीही केलेले नाही.

maharashtra government defends ladki bahin yojana in bombay high court
महिला सशक्तीकरणासाठी ‘लाडकी बहीण’; राज्य शासनाचे उच्च न्यायालयात उत्तर; अतिरिक्त भार पडत नसल्याचे स्पष्टीकरण
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
L&T , Subramaniam, 90 Hours Work , Work Hours ,
स्त्रीद्वेष्टेपणा की कर्मचाऱ्यांच्या शोषणाची पूर्वतयारी? 
national women commission form fact finding committee in murder of a girl Inside bpo premises
‘बीपीओ’च्या आवारातील युवतीच्या खूनप्रकरणी सत्यशोधन समिती; राष्ट्रीय महिला आयोगाचा निर्णय; दहा दिवसांत अहवाल
History , Art , Contemporary Visual Art , Feminist ,
दर्शिका : ‘अनंतकाळच्या माते’ची अनंतकाळची लढाई…
priti karmarkar
स्त्रीप्रश्नांविषयी आग्रही आणि संवेदनशीलही!
woman in the womens movement and Gender inequality
स्त्री चळवळीतील ‘स्त्री’ : अभूतपूर्व‘स्त्री’
Citizen Centered Leave Protection Digital Personal Leave Protection Right to Privacy
‘विदा संरक्षण’ नवउद्यामींना मारक!

u

हेही वाचा – अजित पवारांकडून करमाळ्यात आमदार संजय शिंदे यांचा प्रचार, महायुती धर्माला कोलदांडा

अरुणादेवी पिसाळ यांनी मतदारसंघातील पाणीप्रश्न, रस्ते विकास झालेला नाही, भूमिपुत्रांना नोकरीची संधी मिळत नाही. वीस वर्षांपूर्वी गेलेली आमदारकी परत मिळवण्यासाठी, तालुक्याचा खुंटलेला विकास पुन्हा सुरू करण्यासाठी मला विजयी करावे असे आवाहन केले.

हेही वाचा – सत्ता आल्यावर कराड जिल्हा करणार – पृथ्वीराज चव्हाण

तर त्यांना पाडा

शरद पवारांनी या वेळी मकरंद पाटील यांच्यावरही टीकास्त्र सोडले. त्यांच्यामुळेच आजच्या सभेचा योग आल्याचे सांगून जर त्यांचे वडील लक्ष्मणराव पाटील असते, तर आजची ही वेळ आली नसती, असे सांगत त्यांना मी भरभरून दिले आहे. परंतु हल्ली त्यांची वृत्ती कुठे काही दिसले की मला द्या, असे मागण्याची झाली असल्याचे दिसून येते असे सांगितले. सभेत त्यांना एक चिठ्ठी आली त्यात पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांचे काय करायचे? असा प्रश्न होता. यावर पवारांनी जर त्यांनी गद्दारी केली असेल तर त्यांना पाडा असे सांगितले.

Story img Loader