राज्यातील काही भाजपा नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली. यात मंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार गोपीचंद पडळकर या भाजपा नेत्यांचा समावेश आहे. यानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया देताना शरद पवारांवर भाजपा नेत्यांनी एकेरी टीका करूनही राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते शांत असल्यावरून नाराजी व्यक्त केली. आता स्वतः शरद पवारांनी यावर प्रतिक्रिया दिली. ते बुधवारी (७ जून) औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार, गोपीचंद पडळकरांनी केलेल्या एकेरी उल्लेखावर विचारलं असता शरद पवारांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “ठीक आहे, त्यांना कशाला महत्त्व देता.”

nashik bjp marathi news, bjp dindori lok sabha election 2024
कोणता समाज, घटक नाराज आहे ? दिंडोरी लोकसभेसाठी भाजप निरीक्षकांकडून चाचपणी
Baramati Namo MahaRojgar Melava
बारामतीमधील शासकीय कार्यक्रमासाठी शरद पवारांना पहिल्यांदा डावललं; सुप्रिया सुळे म्हणाल्या…
himachal pradesh political crisis
हिमाचलमधील सरकार वाचविण्याचे प्रयत्न; काँग्रेस निरीक्षक राज्यात दाखल; नाराज आमदारांशी चर्चा
ajit pawar budget speech
अजित पवारांनी कुसुमाग्रजांच्या ‘या’ कवितेच्या ओळी म्हणताच सभागृहात हशा; म्हणाले, “विरोधकांनी प्रतिक्रियांचा पुनर्विचार करावा!”

“मोबाईलवरील मेसेजवर लगेच रस्त्यावर उतरून धार्मिक स्वरुप देणं योग्य नाही”

देशातील दंगलींवर बोलताना शरद पवार म्हणाले, “अहमदनगर जिल्ह्यात संगमनेरमध्ये घटना घडली आहे. त्यानंतर कोल्हापूरमध्येही तणाव आहे. कुणीतरी मोबाईलवर मेसेज पाठवला. तो मेसेज चुकीचाही असेल, पण त्यासाठी लगेच रस्त्यावर उतरून त्याला धार्मिक स्वरुप देणं हे काही योग्य नाही.”

“राज्यकर्तेच रस्त्यावर उतरून समाजात कटुता निर्माण करत आहेत”

“आज सत्ताधारी पक्ष अशा सर्व गोष्टींना प्रोत्साहन देत आहे. राज्यकर्त्यांची जबाबदारी राज्यात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करणे आहे. मात्र, राज्यकर्ते व त्यांचे सहकारी रस्त्यावर उतरायला लागले आणि त्यामुळे समाजात जातीत कटुता निर्माण झाली तर हे चांगलं लक्षण नाही,” असं मत शरद पवारांनी व्यक्त केलं.

हेही वाचा : संजय राऊत ‘त्या’ खासदाराचं नाव घेताच ‘ऑन कॅमेरा’ थुंकले, शरद पवार स्पष्टच म्हणाले, “मी…”

“औरंगाबादमध्ये औरंगजेबाचा फोटो दाखवला म्हणून पुण्यात आंदोलन करण्याचं काय कारण?”

“समाजात कटुता निर्माण केली जात आहे. औरंगाबादमध्ये कुणीतरी औरंगजेबाचा फोटो दाखवला. त्यासाठी पुण्यात आंदोलन करायचं काय कारण आहे,” असंही पवारांनी नमूद केलं.