Premium

भाजपा नेत्यांकडून एकेरी उल्लेख करत टीका, शरद पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया, म्हणाले…

राज्यातील काही भाजपा नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली. यावर स्वतः शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली.

Sharad Pawar Sudhir Mungantiwar Gopichand Padalkar
एकेरी टीकेवर शरद पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया (छायाचित्र – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

राज्यातील काही भाजपा नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली. यात मंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार गोपीचंद पडळकर या भाजपा नेत्यांचा समावेश आहे. यानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया देताना शरद पवारांवर भाजपा नेत्यांनी एकेरी टीका करूनही राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते शांत असल्यावरून नाराजी व्यक्त केली. आता स्वतः शरद पवारांनी यावर प्रतिक्रिया दिली. ते बुधवारी (७ जून) औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार, गोपीचंद पडळकरांनी केलेल्या एकेरी उल्लेखावर विचारलं असता शरद पवारांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “ठीक आहे, त्यांना कशाला महत्त्व देता.”

“मोबाईलवरील मेसेजवर लगेच रस्त्यावर उतरून धार्मिक स्वरुप देणं योग्य नाही”

देशातील दंगलींवर बोलताना शरद पवार म्हणाले, “अहमदनगर जिल्ह्यात संगमनेरमध्ये घटना घडली आहे. त्यानंतर कोल्हापूरमध्येही तणाव आहे. कुणीतरी मोबाईलवर मेसेज पाठवला. तो मेसेज चुकीचाही असेल, पण त्यासाठी लगेच रस्त्यावर उतरून त्याला धार्मिक स्वरुप देणं हे काही योग्य नाही.”

“राज्यकर्तेच रस्त्यावर उतरून समाजात कटुता निर्माण करत आहेत”

“आज सत्ताधारी पक्ष अशा सर्व गोष्टींना प्रोत्साहन देत आहे. राज्यकर्त्यांची जबाबदारी राज्यात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करणे आहे. मात्र, राज्यकर्ते व त्यांचे सहकारी रस्त्यावर उतरायला लागले आणि त्यामुळे समाजात जातीत कटुता निर्माण झाली तर हे चांगलं लक्षण नाही,” असं मत शरद पवारांनी व्यक्त केलं.

हेही वाचा : संजय राऊत ‘त्या’ खासदाराचं नाव घेताच ‘ऑन कॅमेरा’ थुंकले, शरद पवार स्पष्टच म्हणाले, “मी…”

“औरंगाबादमध्ये औरंगजेबाचा फोटो दाखवला म्हणून पुण्यात आंदोलन करण्याचं काय कारण?”

“समाजात कटुता निर्माण केली जात आहे. औरंगाबादमध्ये कुणीतरी औरंगजेबाचा फोटो दाखवला. त्यासाठी पुण्यात आंदोलन करायचं काय कारण आहे,” असंही पवारांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sharad pawar comment on criticism by bjp leaders sudhir mungantiwar gopichand padalkar pbs

Next Story
Petrol-Diesel Price on 7 June: आज अनेक शहरांत कमी झाले पेट्रोल-डिझेलचे दर, जाणून घ्या नवीन दर