scorecardresearch

Premium

“उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात आणि मी अशा तिघांनी ठरवलं, तर…”, शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्याची जोरदार चर्चा

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी धुळ्यात शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा उल्लेख करत सूचक विधान केलं आहे.

Sharad Pawar Uddhav Thackeray Balasaheb Thorat
शरद पवारांचं राज्यातील राजकारणावर मोठं वक्तव्य (संग्रहित छायाचित्र)

शिवसेना आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीनंतर राज्यातील राजकारणाची समीकरणं बदलली आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी धुळ्यात शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा उल्लेख करत सूचक विधान केलं आहे. ते रविवारी मुंबईत (३० जुलै) धुळ्याच्या इतिहासाचार्य वि. का. राजवाडे संशोधन मंडळाने आयोजित केलेल्या सहा ऐतिहासिक ग्रंथांच्या प्रकाशन सोहळ्यात बोलत होते. यावेळी उद्धव ठाकरे व बाळासाहेब थोरातही उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले, “धुळ्यात जे काम सुरू आहे त्या कामाला प्रोत्साहन दिलं पाहिजे. राज्य सरकारशी बोलणं आम्हाला सध्या जरा अडचणीचं आहे. मात्र, त्यातून आज ना उद्या कधीतरी मार्ग निघतील. ज्यावेळी मार्ग निघतील त्यावेळी राज्य सरकारलाही या कामासाठी मदत करण्यासाठी भाग पाडण्यास फारशी काही अडचण येणार नाही.”

jayant patil on chandrashekhar bavankule, jayant patil criticize chandrashekhar bavankule, invitation given to rahul gandhi to come baramati
“…तर बावनकुळेंना दारोदारी का फिरावे लागत आहे?”, जयंत पाटील यांचा टोला
Sharad Pawar Eknath Shinde Ajit Pawar
बंडानंतर धनुष्यबाण शिंदे गटाला, आता घड्याळ कुणाला मिळेल? दिल्लीत एकनाथ शिंदे म्हणाले…
Vijay Wadettiwar
“दोन माणसं भाजपाबरोबर गेली तरी त्यांना पक्ष आणि चिन्ह मिळेल, कारण…”, विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य
Rahul Narwekar Ambadas Danve
VIDEO: “नार्वेकरांना कुणी काय मार्गदर्शन केलं याची…”, अंबादास दानवेंचा हल्लाबोल, म्हणाले…

“उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात आणि मी अशा तिघांनी ठरवलं, तर…”

“उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात आणि मी अशा तिघांनी ठरवलं, तर कदाचित महाराष्ट्रात काही होईल. यापेक्षा विशेष वेगळं काही सांगायची गरज नाही. यातील राजकीय गोष्टींपेक्षा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, साहित्यिक अशा सगळ्या संस्था आणि त्यांच्याकडील खजिना जतन केला पाहिजे. त्यासाठी राज्य सरकारने अशा संस्थांच्या पाठिशी उभं राहिलं पाहिजे”, असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं.

व्हिडीओ पाहा :

हेही वाचा : “आदित्य ठाकरेंनी प्रियंका चतुर्वेदींचं सौंदर्य पाहून…”; ‘त्या’ नेत्याचा उल्लेख करत शिंदे गटाचा दावा, म्हणाले…

“उद्धव ठाकरेंना कदाचित माहिती नसेल, पण मधल्या काळात…”

“उद्धव ठाकरेंना कदाचित माहिती नसेल, पण मधल्या काळात मर्यादित काळात ते मुख्यमंत्री असताना त्यांच्या सरकारकडून दोन तीन गोष्टी करून घेतल्या. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय या संस्थेचा अध्यक्ष मीच आहे. त्या संस्थेला ५ कोटी रुपयांची देणगी देण्यात आली होती. अशाच एक दोन उत्तम संस्थांनाही राज्य सरकारकडून काही ना काही मदत देण्याची खबरदारी आम्ही लोकांनी घेतली. तसंच काम आजही करण्याची गरज आहे”, असंही शरद पवारांनी नमूद केलं.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sharad pawar comment on maharashtra politics mention uddhav thackeray balasaheb thorat pbs

First published on: 30-07-2023 at 19:11 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×