Premium

बारामतीत सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवार निवडणूक लढणार? रोहित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…

अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार बारामतीतून निवडणूक लढणार असल्याच्या चर्चेवर रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

rohit pawar on supriya sule and sunetra pawar
(फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार सत्तेत सहभागी झाले आहेत. पक्षात फूट पडल्यामुळे लोकसभा आणि विधानसभेच्या जागा वाटपाचं समीकरण काय असेल? यावरून चर्चा सुरू आहे. दरम्यान, बारामती लोकसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक लढणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे बारामतीत नणंद विरुद्ध भावजय असा सामना बघायला मिळणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बारामतीतून सुनेत्रा पवार निवडणूक लढणार असल्याच्या चर्चेवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अशा चर्चांवर कुणीही विश्वास ठेवू नये. जोपर्यंत एखाद्या पक्षाकडून उमेदवारी घोषित केली जात नाही, तोपर्यंत यावर चर्चा करून वेळ वाया घालवू नये, अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

हेही वाचा- पंकजा मुंडेंवरील कारवाईवरून सुप्रिया सुळेंची भाजपावर टीका; म्हणाल्या, “निष्ठावंतांवर किती अन्याय…”

बारामती लोकसभा मतदारसंघातील सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या संभाव्य लढतीबाबत विचारलं असता रोहित पवार म्हणाले, “अशा चर्चांवर कुणीही विश्वास ठेवू नये. जेव्हा एखाद्या पक्षाच्या माध्यमातून उमेदवारी घोषित केली जाईल. त्यानंतरच त्या गोष्टीला खरं समजावं. आज यावर चर्चा करून आपल्या सर्वांचा वेळ वाया घालवू नये.”

हेही वाचा- बारामतीतून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक लढवणार? सुप्रिया सुळेंनी केलं स्वागत, म्हणाल्या…

“शेवटी याबाबत भाजपा आणि त्यांच्याबरोबर गेलेले नेते निर्णय घेतील. पण बारामती लोकसभा मतदारसंघासाठी शरद पवारांच्या मार्गदर्शनाखालील राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळेच उभ्या राहतील. त्यांच्या विरोधात कोण उभं राहतंय? हे आपल्याला येत्या काळात बघावं लागेल,” असंही रोहित पवार म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sharad pawar faction mla rohit pawar reaction on sunetra pawar will contest election from baramati against supriya sule rmm

First published on: 26-09-2023 at 22:24 IST
Next Story
“निवडणूक आयोगाचा निर्णय…”, अध्यक्षपदाच्या निवडीवरून अजित पवारांचं विधान