नाट्यपरिषदेमध्ये सुरू असलेल्या वादाची चर्चा होत असताना नाट्य परिषदेचे तहहयात विश्वस्त शरद पवार यांनी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाला आपण तुमच्यासोबत आहोत, असा विश्वास दिला आहे. आज ६ ऑक्टोबर २०२१ रोजी संपन्न झालेल्या नियामक मंडळ सभेमध्ये शरद पवार, शशी प्रभू यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी म्हणून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, तसेच, मोहन जोशी, अशोक हांडे, गिरीश गांधी या चार सदस्यांची नाट्य परिषदेच्या विश्वस्तपदी नियुक्ती करण्यात आली. या सभेला ५९ पैकी एकूण ४१ सदस्य हजर होते तर ७ सदस्यांनी आपला पाठिंबा पत्राद्वारे कळविला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, या सभेसमोर बोलताना शरद पवारांनी नाट्यविषयक उपक्रम राबवण्यासंदर्भात भूमिका स्पष्ट केली. नाट्य परिषदेच्या भावी कार्यासाठी महत्वपूर्ण योजना राबविण्यात याव्यात व नाट्य परिषदेच्या संकुल दुरुस्तीसाठी व नाट्यविषयक उपक्रम राबविण्यासाठी तसेच शाखांच्या सक्षमीकरणासाठी मोठा निधी उभारण्यात येईल असे त्यांनी सांगितले. याबाबत राज्य शासनाची मदत मिळणेकामी विशेष प्रयत्न करू असे ते म्हणाले. सांस्कृतिक क्षेत्र व नाट्यक्षेत्र पुढे नेण्यासाठी सर्वांनी एकत्र काम करण्याची आवश्यकता आहे. नाट्य परिषदेत असलेल्या वादावर बोलताना ते म्हणाले की ज्यांना कुणाला वाद घालायचे त्यांना वाद घालू द्या. ज्यांना कुणाला मुलाखती छापायच्या त्यांना छापूद्या. नाट्य परिषदेच्या व नाट्य क्षेत्राच्या या कामासाठी मी सदैव तुमच्या सोबत आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar in natya parishad meeting on conflicts issues pmw
First published on: 06-10-2021 at 20:04 IST