scorecardresearch

शरद पवार हे एकट्या अजित पवार यांच्या मालकीचे नाहीत- शहाजी बापू पाटील

शिंदेंचा दसरा मेळावा हा ऐतिहासिक होईल, अलोट गर्दी असेल

शरद पवार हे एकट्या अजित पवार यांच्या मालकीचे नाहीत- शहाजी बापू पाटील
शहाजी बापू पाटील

राष्ट्रवादी चे सर्वेसर्वा शरद पवार हे अजित पवार यांच्या एकट्या मालकीचे नाहीत. ते राज्याचे आणि देशाचे नेते आहेत त्यांच्यावर बोलण्याचा आणि टीका करण्याचा अधिकार आहे अशी टोलेबाजी शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी केली आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये पत्रकारांशी बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दसरा मेळाव्याला अलोट गर्दी होईल तो ऐतिहासिक मेळावा ठरेल अस देखील ते म्हणाले आहेत. 

शहाजी बापू पाटील यांनी चौफेर फटकेबाजी करत अजित पवार यांना लक्ष केल्याच पाहायला मिळालं. नुकतीच अजित पवार यांनी शहाजी बापू यांची शरद पवार यांच्यावर बोलण्याची पात्रता नाही अशी टीका केली होती. त्यालाच शहाजी बापू यांनी प्रतिउत्तर देत शरद पवार हे अजित पवारांच्या एकट्या मालकीचे नाहीत, ते राज्याचे आणि देशाचे नेते आहेत. त्यांचं नेतृत्व, व्यक्तिमत्त्व हे केवळ अजित पवार यांच्या पुरते मर्यादित नाही. त्यांच्या विषयी चांगल बोलण्याचा आणि टीका करण्याचा अधिकार लोकशाहीने दिला आहे असे शहाजी बापू पाटील म्हणाले आहेत. 

शहाजी बापू पाटील पुढे म्हणाले की, मंत्री मंडळाचा विस्तार हे केवळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सांगू शकतात. जरी कोणी सांगितलं तरी त्यांचा अंदाज चुकणार. सध्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात गुन्हेगारी वाढली आहे. परंतु, देवेंद्र फडणवीस हे गुन्हेगारी आटोक्यात आणतील, त्यांच्याकडे गृहमंत्री खात आहे. चंद्रकांत खैरे यांच्या आरोपावर ते म्हणाले की, गर्दी जमवायला माझ्याकडे एक रुपया आला नाही. माझ्या मुलाची शपथ, मीच म्हटलं फुकट गाड्या बघा, राहिलेल्या गाड्याच मुंबईतुन आल्यावर बघतो. शिंदेच्या दसऱ्या मेळाव्याला अलोट गर्दी होईल. तो ऐतिहासिक मेळावा असेल. आता बिकेसी च मैदान हे इतिहासाच नवं पर्व आहे. पुढील वर्षी पण मेळावा तिथंच होणार, आता मैदान बदल जाणार नाही. नार्वेकर शिंदे गटात जाणार असण्याची शक्यता आहे, ही बातमी टीव्हीवर पाहिली तशी काही वर शक्यता झाली असेल. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस ही युती कुठल्याच राजकीय विचारात बसत नाही अस देखील ते म्हणाले आहेत. 

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या