Sharad Pawar : विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी राज्यात सुरु आहे. राजकीय पक्षांकडून निवडणुकीचा प्रचार जोरात सुरु आहे. राज्यभरात विविध मतदारसंघात आघाडी आणि युतीसह इतर पक्षांच्या नेत्यांच्या सभांचा धडाका सुरु आहे. या विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी मुख्य लढत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या पार्श्वभूमीवर आज मुंबईत महाविकास आघाडीची सभा पार पडली.

या सभेला काँग्रेस नेते राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह इंडिया आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित होते. या सभेत महाविकास आघाडीकडून महाराष्ट्रासाठी पाच गॅरंटी देण्यात आल्या. यामध्ये शरद पवार यांनी सभेत बोलताना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत भाष्य केलं. राज्यात ‘मविआ’चं सरकार आल्यास ३ लाखांपर्यंतचं शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार, असं मोठं आश्वासन शरद पवार यांनी यावेळी दिलं.

MVA Five Big Promises For Maharashtra
MVA : महाराष्ट्रासाठी महाविकास आघाडीने दिलेली पाच प्रमुख आश्वासनं काय? महिलांना किती पैसे दिले जाणार?
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…
Dhananjay Munde On Parli Assembly Constituency
Dhananjay Munde : “माझा राजकीय अस्त करण्याची व्यूहरचना…”; धनंजय मुंडेंच्या विधानाचा रोख कुणाकडे?
Uddhav Thackeray News Update News
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांना म्हणाले, “अहो देवाभाऊ, जाऊ तिथे खाऊ, मुंब्र्याच्या वेशीवर..”
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
NCP Clock
NCP Clock Symbol : ऐन निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवारांना आदेश; पक्षचिन्हाबाबत दिला ३६ तासांचा अल्टिमेटम!
What Rahul Gandhi Said?
Rahul Gandhi : “महाराष्ट्रात सरकार आल्यानंतर महिलांना प्रति महिना ३ हजार रुपये आणि बस प्रवास मोफत”, राहुल गांधींची गॅरंटी
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

हेही वाचा : “महाराष्ट्रात सरकार आल्यानंतर महिलांना प्रति महिना ३ हजार रुपये आणि बस प्रवास मोफत”, राहुल गांधींची गॅरंटी

शरद पवार काय म्हणाले?

“लोकसभेच्या निवडणुकीवेळी लोकांनी महाविकास आघाडीला शक्ती देण्याचं काम केलं. राज्यातील महाविकास आघाडीची सत्ता गेल्यानंतर देशात विकासाच्या बाबतीत आपलं राज्य ६ नंबरवर गेलं. महाराष्ट्र राज्य एकेकाळी कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत एक नंबरचं राज्य होतं. मात्र, आज राज्यात अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यात जवळपास ६४ हजार महिला आणि मुली बेपत्ता आहेत. आधी महाराष्ट्र शिक्षणाच्या बाबतीत प्रगत राज्य होतं. मात्र, आता शिक्षणाच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरु आहे. प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्र राज्य मागे गेलं आहे”, असं म्हणत शरद पवारांनी महायुतीवर हल्लाबोल केला.

“सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काही दिवसांपूर्वी कोसळला. त्या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं होतं. त्यानंतर सरकारच्यावतीने सांगण्यात आलं की त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वारा आला आणि पुतळा कोसळला. मुंबईमधील पुतळे वाऱ्याने कोसळत नाहीत. याचं कारण इकडे भ्रष्टाचार नव्हता. पण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारताना मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. भ्रष्टाचाराचा विक्रम या भाजपाच्या लोकांनी केला”, असा हल्लाबोल शरद पवारांनी महायुतीवर केला.

“आज आम्ही पाच गॅरंटी सांगितल्या आहेत. त्यामध्ये आम्ही कृषी संदर्भातील गॅरंटी देत आहोत. केंद्रात मनमोहन सिंह यांचं सरकार आसताना आम्ही शेतकऱ्यांना मोठी सवलत दिली होती. आता देखील आमच्या महाविकास आघाडीच्यावतीने मी आपल्याला सांगतो की, तुम्ही लोकांनी महाराष्ट्राची सत्ता महाविकास आघाडीच्या हातात दिल्यानंतर कृषी संदर्भात योजना राबवली जाईल. या योजनेमध्ये शेतकऱ्यांचं ३ लाख रुपयांपर्यंतच कर्ज माफ केलं जाईल. तसेच जो नियमित कर्जफेड करतो, त्या शेतकऱ्यांना ५० हजार प्रोत्साहन अनुदान दिलं जाईल”, असं मोठं आश्वासन शरद पवार यांनी या सभेत बोलताना दिलं.

Story img Loader