शरद पवारांनी राजीनामा देणं मला अपेक्षित होतं असं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे. आज शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर महाराष्ट्रभरातल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून या निर्णयाला विरोध होतो आहे. लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा मुंबईत होता. त्या कार्यक्रमात भाषण करताना शरद पवार यांनी आज आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचं म्हटलं. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली अशात अंजली दमानिया यांनी एक वेगळाच आरोप शरद पवारांवर केला आहे.

काय म्हटलं आहे अंजली दमानिया यांनी?

“शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देणं हे मला अपेक्षित होतं. १९ एप्रिलला मी माझ्या काही जवळच्या पत्रकार मित्रांना सांगितलं होतं की आत्ता जे चाललं आहे ते माझ्या राजकीय विश्लेषणाप्रमाणेच आहे. ते हेच आहे की भाजपाला राष्ट्रवादी काँग्रेसोबत युती करायची आहे. पण त्या युतीत त्यांना शरद पवार नकोत त्यांना फक्त अजित पवारच आहेत. अजित पवार जर पक्ष फोडून गेले असते तर ते शरद पवारांना मान्य झालं नसतं.

Navneet Rana Answer to Sanjay Raut
‘नाची’, ‘डान्सर’, बबली म्हणणाऱ्या संजय राऊतांना नवनीत राणांचं जशास तसं उत्तर, म्हणाल्या, “मला बोलण्याआधी..”
Supriya Sule, Amol Kolhe, Ajit Pawar taunt,
खासदार डॉ. अमोल कोल्हे हे एक सुसंस्कृत लोकप्रतिनिधी – सुप्रिया सुळे
girish mahajan statement on bjp mp unmesh patil
खासदार उन्मेश पाटील यांना चुकीची जाणीव होईल; गिरीश महाजन यांचा सूचक इशारा
Narendra Modi and Jawaharlal Nehru
Video: मोदी सरकार उद्योगपतींचं? आरोपांबाबत विचारणा करताच मोदींनी दिला नेहरूंच्या कार्यकाळाचा संदर्भ; म्हणाले…

अजित पवारांची बॉडी लँग्वेज पाहिलीत का?

पक्ष फुटताना पाहणं किंवा राजीनामा देणं आणि अजित पवारांना अध्यक्ष करणं असे दोनच मार्ग शरद पवारांपुढे उरले होते. आत्ताच्या घडीला जे काही दबावतंत्र चाललं आहे ते भाजपाचं आहे. भाजपाला महाराष्ट्रावर पकड तयार करायची आहे त्यासाठी ते वाट्टेल ते करतील. आज जेव्हा शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर आपण अजित पवार यांची बॉडी लँग्वेज पाहिली तर ते सारखे कार्यकर्त्यांवर चिडत होते. त्यावरूनच सगळं लक्षात आलं.” असंही दमानिया यांनी म्हटलं आहे.

शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केल्यानंतर दुपारी पावणेतीनपर्यंत शरद पवार यांना सगळेच जण आवाहन करत होते की तुम्ही हा तुमचा निर्णय मागे घ्या. मात्र शरद पवार यांनी निर्णय मागे घेतला नाही. प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार यांनी सगळ्यांना आश्वासन दिलं की आम्ही त्यांच्याशी चर्चा करतो. शरद पवार यांच्या जेवणाची वेळ ठरलेली असते ती टळून गेली आहे त्यामुळे तुम्ही त्यांचा विचार करा आणि त्यांना इथून जाऊ द्या. या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर शरद पवार हे कार्यक्रम स्थळावरून सिल्वर ओक या ठिकाणी गेले आहेत. मात्र कार्यकर्ते उपोषणाला बसले आहेत. निर्णय मागे घेतल्याशिवाय आम्ही उपोषण मागे घेणार नाही ही त्यांची भूमिका आहे. त्याच कार्यकर्त्यांशी शरद पवार यांनी सुप्रिया सुळेंच्या मोबाईलवरून संवाद साधला. यावेळी कार्यकर्त्यांनी “हमारा नेता कैसा हो शरद पवार जैसा हो” आणि “सारे देश की बुलंद आवाज शरद पवार शरद पवार” अशा घोषणाही दिल्या.