Sharad Pawar : “लाडक्या बहिणींना १५०० रुपये देतात, पण त्यांच्या…”, शरद पवारांची महायुतीवर जोरदार टीका

महाराष्ट्रात सत्तेचा गैरवापर सुरु आहे, या सरकारने रोजगाराच्या संधी निर्माण केल्या नाहीत अशीही टीका शरद पवार यांनी केली.

What Sharad Pawar Said?
शरद पवारांनी नेमकं लाडकी बहीण योजनेबाबत काय म्हटलं आहे? (फोटो सौजन्य-शरद पवार फेसबुक पेज )

Sharad Pawar : शरद पवार यांची धुळ्यातल्या शिंदखेडा या ठिकाणी सभा पार पडली. या सभेत त्यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली. लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करत त्यांनी महायुती सरकावर हल्लाबोल केला. लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत महिलांना १५०० रुपये दरमहा दिले जातात. त्याचे फॉर्मही भरुन घेण्यात आले. साधारण ८० लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे तसंच येत्या काळातही तो मिळेल असं महायुती सरकारने म्हटलं आहे. मात्र शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी या योजनेचा मुद्दा उपस्थित करत थेट महायुतीवर हल्लाबोल केला आहे.

काय म्हणाले शरद पवार?

“मी दहा वर्षे कृषी मंत्री म्हणून काम केलं आहे. त्यावेळी देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. आजच्या राज्यकर्त्यांना शेती आणि शेतकरी यांच्याविषयी काहीही आस्था नाही. शेतीसंदर्भातलं योग्य धोरण राबवलं जात नाही. कांद्यासंदर्भातलं उदाहरणच बघा. मोदी सरकारने कांद्यावर निर्यातबंदी आणली. कांद्याला भाव मिळाला नव्हता. कांदा उत्पादक शेतकऱ्याने कष्टाने पिक घेतलं. त्यानंतर निर्यातबंदी करण्यात आली. गहू, तांदूळ याबाबत हे घडलं. जे पिकवाल त्या धान्यावर, उत्पादनावर निर्यात बंदी. मोदी सरकार शेतकरी विरोधी आहे.” असं शरद पवार ( Sharad Pawar ) म्हणाले.

सरकारच्या डोक्यात सत्तेचा माज शिरला आहे

सत्तेचा माज सरकारच्या डोक्यात गेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला लोकशाहीचा विचार दिला. मात्र या लोकांना सत्तेचा माज आला आहे. खड्यासारखं या लोकांना बाजूला करा. येत्या निवडणुकीत तुम्हाला ही संधी आहे. असंही शरद पवार म्हणाले. एवढंच नाही तर एकदा आमच्या हाती सत्ता द्या. महाराष्ट्राचा चेहरा तुम्हाला बदलेला दिसेल अशी खात्री मी तुम्हाला देतो असंही शरद पवार ( Sharad Pawar ) म्हणाले.

हे पण वाचा- शरद पवार गटाच्या संपर्कात आणखी एक नेता! जयंत पाटलांसोबत कारप्रवास अन्…

लाडकी बहीण योजनेवरुन टीका

महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेवरही शरद पवारांनी जोरदार टीका केली. “महाराष्ट्रात गुंडगिरीचं राज्य सुरु आहे. सत्तेचा गैरवापर सुरु आहे. काखाने, सहकार चळवळी यांच्यासाठी या सरकारने काहीही काम केलं नाही. तसंच रोजगाराच्या संधीही निर्माण केल्या नाहीत. मागच्या १० वर्षांत देशाचा विकास झालेला नाही. हे सरकार आता बहिणींना दरमहा १५०० रुपये देतं आहे. पण लाडक्या बहिणींची अब्रू कोण वाचवणार? बहिणींचा सन्मान राखला गेला पाहिजे पण त्याकडे या सरकारचं मुळीच लक्ष नाही.” असं म्हणत शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी लाडकी बहीण योजनेवरुनही सरकारला लक्ष्य केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sharad pawar slams mahayuti governement over ladki bahin yojana what did he say scj

First published on: 15-09-2024 at 12:44 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
Show comments