Sharad Pawar : लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातली सध्या खूप चर्चेत असलेली योजना आहे. या योजनेवरुन महायुतीत ऑल इज नॉट वेल आहे का? अशीही चर्चा झाली होती. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी लाडकी बहीण योजना आणि महायुती सरकार यांच्याबाबत एक महत्त्वाचं विधान केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लाडकी बहीण योजनेअंतर्गत १५०० रुपये दरमहा मिळत आहेत

लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत महिलांना १५०० रुपये देण्यात येत आहेत. पात्र महिलांना हे पैसे सरकारतर्फे दिले जात आहेत. ऑगस्ट महिन्यांत या योजनेचे पैसे महिलांना मिळाले. ८० लाख महिलांना हे पैसे मिळाले आहेत असं सुरुवातीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगितलं. आता १ कोटी ५९ लाख लाख महिलांच्या खात्यात रक्कम वर्ग करण्यात आली आहे. या योजनेचा फायदा होईल का? असा प्रश्न विचारला असता शरद पवारांनी त्यावर उत्तर दिलं आहे.

काय म्हटलं आहे शरद पवार यांनी?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन टर्म झाल्या आहेत. तिसऱ्या टर्म सुरु आहे. लाडकी बहीण योजनेचं कौतुक पंतप्रधान करुन गेले. मात्र महिलांच्या व्यथा आणि दुःख त्यांना दिसलं नाही का? असा प्रश्न शरद पवारांनी विचारला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेवढा अडीच वर्षांचा काळ सोडला तर बाकी साडेसात वर्षे यांचीच सत्ता आहे. त्या काळात लाडक्या बहिणींचं दुःख यांना दिसलं नाही का? असा प्रश्न शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी विचारला आहे. बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी ( Sharad Pawar ) हे वक्तव्य केलं आहे.

महिलांची सुरक्षा हा प्रश्न महत्त्वाचा आहे

महाराष्ट्रात महिला सुरक्षेचा प्रश्न महत्त्वाचा आहे. बेरोजगारी, महागाईचा विचार बहिणी करतील. रोज वर्तमानपत्र पाहिलं तर स्त्रियांवरच्या अत्याचाराची बातमी नित्याची झाली आहे आणि ही बाब क्लेशदायक आहे. खऱ्या अर्थाने लाडक्या बहिणांना सुरक्षेची आणि सन्मानाची गरज आहे. पैसे देऊन टीव्हीवर आणि वर्तमानपत्रात जाहीरात देऊन तुम्ही त्यांच्याबद्दल आस्था दाखवत नाही हे लक्षात ठेवा, महिलांवरची अत्याचार कमी झालेले नाहीत तर वाढलेले आहेत असं शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी स्पष्ट केलं.

हे पण वाचा- राज्यात आमचेच सरकार असणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा

लाडकी बहीण योजनेचा फायदा होईल असं वाटत नाही

लाडकी बहीण योजनेचा फायदा महायुतीला होईल असं विचारलं असता शरद पवारांनी म्हटलं, “१ कोटी पेक्षा जास्त महिलांना पैसे दिल्याचा दावा केला जातो आहे. अजून दोन हप्ते देतील. लाडकी बहीण योजनेचा परिणाम थोडासा होईल, फार काही फरक पडणार नाही.समाजात, लोकांच्यात, बहिणींच्या घारत बेकारीचा प्रश्न आहे. महागाई स्त्रियांवरच्या अत्याचाराचा प्रश्न आहे. विकासाच्या बाबत भरीव कामगिरी आहे असंही दिसत नाही. या गोष्टींचा विचार बहिणी नक्की करतील.” असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

गावागावात जातो, मेळावा घेतो, बहि‍णींशी संवाद करतो, त्या अनेक प्रश्न प्रकर्षानं मांडतात, लाडकी बहीणचा फार परिणाम जाणवणार नाही, पैशांचा परिणाम थोडाफार होईल पण त्यांचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती नाही, असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar statement about ladki bahin yojana what he say scj
Show comments