मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट लिहून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर विखारी टीका केली आहे. या प्रकरणानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. केतकी विरोधात पुण्यासह आणि ठाण्यात एकूण ती गुन्हे दाखल झाले आहेत. याबाबत शरद पवारांना विचारलं, कोण केतकी चितळे मी तिला ओळखत नाही, असं म्हणत त्यांनी या प्रकरणावर भाष्य करण्याचं टाळलं आहे. संबंधित व्यक्तीला आपण ओळखत नसून नेमकं प्रकरण काय आहे, हेही मला माहीत नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. ते हिंगोली येथे एका पत्रकार परिषदेत बोलत होते.
जितेंद्र आव्हाडांसह सर्वच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केतकीवर कारवाईची मागणी केली. तिच्याविरोधात ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तिला पोलिसांनी चौकशीसाठी नवी मुंबईतून ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर आता तिला अटक करण्यात आली आहे. यादरम्यान, तिला ठाणे क्राईम ब्रांचकडे सोपवण्यात येत असताना तिच्यावर काळी शाई फेकण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.
एखादा राजकारणी बाहेरून येतो अन् औरंगजेबच्या समाधीचं दर्शन घेतो, याचा मी निषेध करतो’ – शरद पवार
यावेळी त्यांनी औरंगजेबच्या कबरीवर जाऊन दर्शन घेणारे एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांच्यावर टिकास्त्र सोडलं आहे. त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं की, काही दिवसापूर्वी बाहेर राज्यातील एक मोठा राजकीय औरंगाबाद येथे येऊन औरंगजेबच्या समाधीचे दर्शन घेतो, हे कुठेतरी जातीपातीचं राजकारण करत आहेत. त्याला महाराष्ट्राचा आणि भारताचा इतिहास माहीत नाही, त्यानं इथे येऊन राजकारण करू नये. ज्या समाधीच्या दर्शनाला तो गेला, या गोष्टीचा मी जाहीरपणे निषेध करतो, असं वक्तव्य खासदार शरद चंद्र पवार यांनी नांदेड येथील पत्रकार परिषदेत केलं आहे.