ठाण्यात झालेल्या राज ठाकरेंच्या उत्तर सभेमध्ये त्यांनी शरद पवारांवर परखड शब्दांत निशाणा साधल्यानंतर त्यापाठोपाठ राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील आंबेडकर जयंतीचं निमित्त साधून शरद पवारांवर ट्विटरच्या माध्यमातून टीका केली. तब्बल १४ ट्वीट्स करत फडणवीसांनी शरद पवारांवर निशाणा साधल्यानंतर आता शरद पवारांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. विशेषत: मुंबई बॉम्बस्फोटांबाबत देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या आरोपांवर शरद पवारांनी भूमिका मांडली आहे. जळगावमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

काय म्हणाले होते फडणवीस?

देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या ट्वीटपैकी एका ट्वीटमध्ये मुंबई बॉम्बस्फोटांवेळी शरद पवारांनी अतिरिक्त बॉम्बस्फोटाची चुकीची माहिती दिल्याचा उल्लेख केला आहे. १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटांनंतर १३ वा बॉम्बस्फोट हा मुस्लिम वस्तीत झाल्याचे खोटे सांगितल्यासंदर्भातही फडणवीसांनी प्रश्न उपस्थित केला आहे. “जेव्हा मुंबईत १२ स्फोट झाले, तेव्हा शरद पवारांनी मुस्लीम भागात झालेला १३वा स्फोट शोधून काढला होता. कायदा आणि सुव्यवस्थेऐवजी लांगुलचालन करण्याला त्यांचं प्राधान्य होतं”, असं फडणवीस आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

MP Sanjay Singh says it is time to say goodbye to BJP
खासदार संजयसिंग म्हणतात, ‘भाजपला निरोप देण्याची वेळ’
A proposal that Chhagan Bhujbal should contest elections from Nashik from BJP
‘कमळ’वर लढण्याचा भुजबळ यांना प्रस्ताव? ओबीसी मतपेढीसाठी भाजप पक्षश्रेष्ठींची खेळी
jitendra awhad marathi news, lucky compound building collapse marathi news
“लकी कंपाऊंड दुर्घटनेनंतरही अधिकाऱ्यांनी शिकायला हवे होते, पण…”, आमदार जितेंद्र आव्हाड यांची पालिका अधिकाऱ्यांवर टीका
Byju employees lost their jobs
नोटीस पीरियड नाही, पगारही नाही; फक्त एक फोन कॉल अन् बायजूच्या कर्मचाऱ्यांनी नोकरी गमावली

शरद पवारांनी दिलं स्पष्टीकरण!

दरम्यान, देवेंद्र फडणवीसांनी दिलेली आकडेवारी खरी असल्याचं शरद पवार म्हणाले आहेत. “मुंबईच्या बॉम्बस्फोटांची माहिती देताना १२ स्फोट झालेले असताना १३ ठिकाणी झाल्याचं मी सांगितल्याचं ते म्हणाले आहेत. मुस्लीम भागाचं नाव घेतल्याचंही सांगितलं. ते १०० टक्के खरं आहे. हे मी केलं”, असं शरद पवार म्हणाले आहेत.

१३ ठिकाणी स्फोट झाल्याचं का सांगितलं?

दरम्यान, १२ ऐवजी मुस्लीम भागात १३वा स्फोट झाल्याचं आपण का सांगितलं याचं कारण देखील पवारांनी यावेळी दिलं आहे. “ज्या १२ ठिकाणी बॉम्बस्फोट झाले, ती हिंदुंची ठिकाणं होती. हा स्फोट कुणी केला? त्याचा शोध मी घेतला. त्यासाठी जे साहित्य वापरलं, ते मी स्वत: जाऊन बघितलं. जो पहिला बॉम्बस्फोट झाला, ते साहित्य मी पाहिलं. ते हिंदुस्थानात तयार होत नाही, ते कराचीत तयार होतं हे मला माहिती होतं. याचा अर्थ त्यामागे बाहेरची शक्ती होती. त्यामुळे कुणीतरी शेजारचा देश हिंदू-मुस्लिमांमध्ये वाद वाढवायचं काम आणि मुंबईत आग लागावी अशा प्रयत्नात होता. स्थानिक मुस्लीम त्यात नव्हते. पण मी बारावं ठिकाण मोहम्मद अली रोड सांगितल्यामुळे जातीय दंगली करण्याची ज्यांची इच्छा होती, त्या दंगली झाल्या नाहीत”, असं शरद पवारांनी नमूद केलं.

राज ठाकरेंनंतर फडणवीसांनी साधला पवारांवर निशाणा; एक दोन नाही तब्बल १४ ट्विट करत म्हणाले, “बाबासाहेब आंबेडकरांच्या…”

“त्यांची विधानं गांभीर्यानं घ्यायची गरज नाही”

“हिंदू-मुस्लीम दोघेही एकत्र आले आणि या परकीय शक्तीच्या विरुद्ध आपण उभं राहावं या मताशी आले. त्यावेळी चौकशीसाठी श्रीकृष्ण आयोग नेमण्यात आला. त्यांच्याकडून मला समन्स आले. मला विचारलं की तुम्ही असं का म्हणाले? मी म्हटलं हे ऐक्य राहावं म्हणून बोललो. त्यांच्या अहवालात त्यांनी स्पष्ट म्हटलं आहे की पवारांनी अशी भूमिका घेतली नसती, तर मुंबईत आग लागली असती. त्यामुळे त्यांचा हा निर्णय समाजाच्या हिताचा होता. पण हे तारतम्य ज्यांना कळत नाही, ज्यांना प्रश्नाचं गांभीर्य कळत नाही, त्यांनी काही विधानं केली असतील, तर त्याची फारशी नोंद घेण्याचं कारण नाही”, असं देखील शरद पवार यावेळी म्हणाले.