scorecardresearch

Premium

मोदी सरकारच्या ९ वर्षांच्या कालखंडातील आवडता मंत्री कोण? शरद पवार स्पष्टच म्हणाले…

पत्रकारांनी शरद पवारांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील सरकारच्या ९ वर्षांच्या कालखंडात मंत्रिमंडळातील कोणता नेता आवडतो असा प्रश्न विचारला.

Sharad Pawar tell favourite Minister in Modi Government
शरद पवारांनी सांगितलं मोदी सरकारमधील आवडत्या मंत्र्याचं नाव आणि कारण (छायाचित्र – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वेळोवेळी विविध मुद्द्यांवर केंद्रातील मोदी सरकारवर शाब्दिक हल्ला चढवला आहे. राज्यातही महाविकासआघाडीकडून सत्ताधारी भाजपा-शिंदे गटावर सडकून टीका होते. अशातच पत्रकारांनी शरद पवारांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील सरकारच्या ९ वर्षांच्या कालखंडात मंत्रिमंडळातील कोणता नेता आवडतो असा प्रश्न विचारला. यानंतर शरद पवारांनी मोदी सरकारमधील आवडत्या नेत्याचं नाव सांगत कारणंही नमूद केली. ते बुधवारी (७ जून) औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

शरद पवार म्हणाले, “काही लोकांचं काम चांगलं आहे. उदाहरणार्थ नितीन गडकरी. मी पाहतो की, त्यांना विकासाच्या कामात रस आहे. शेवटी शासन तुमच्या हातात आल्यावर सरकारने काही तरी ‘रिझल्ट’ दिला पाहिजे. त्यात नितीन गडकरी पुढे आहेत. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते पक्षीय दृष्टिकोन ठेवत नाहीत.”

harideep singh nijjar
पार्किंगजवळ अडवली गाडी, झाडल्या ५० गोळ्या; हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचा थरारक घटनाक्रम वाचा!
Parineeti troll
“ही तर हद्द झाली…,” लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी परिणीती चोप्रा ट्रोल, अभिनेत्रीबद्दल नाराजी व्यक्त करत नेटकरी म्हणाले…
sharad pawar narendra modi (1)
“पंतप्रधान मोदींचं ‘ते’ विधान क्लेशदायक”, शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका; दिले १९९३ च्या घडामोडींचे दाखले!
Pankaja Munde Narendra Modi
“हा तुमचा पक्षाला इशारा आहे का?”, पंकजा मुंडे स्पष्टच म्हणाल्या, “मी त्यांना…”

“असा अनुभव केवळ गडकरींबद्दलचाच आहे”

“आपण नितीन गडकरींना एखादा प्रश्न आपण सांगितला, तर ते तो प्रश्न कोण सांगतोय यापेक्षा तो प्रश्न किती महत्त्वाचा आहे याकडे लक्ष देतात. ही एक समंजसपणाची गोष्ट आहे. मात्र, असा अनुभव केवळ त्यांच्याबद्दलचाच आहे,” असंही शरद पवारांनी सांगितलं.

“मोबाईलवरील मेसेजवर लगेच रस्त्यावर उतरून धार्मिक स्वरुप देणं योग्य नाही”

देशातील दंगलींवर बोलताना शरद पवार म्हणाले, “अहमदनगर जिल्ह्यात संगमनेरमध्ये घटना घडली आहे. त्यानंतर कोल्हापूरमध्येही तणाव आहे. कुणीतरी मोबाईलवर मेसेज पाठवला. तो मेसेज चुकीचाही असेल, पण त्यासाठी लगेच रस्त्यावर उतरून त्याला धार्मिक स्वरुप देणं हे काही योग्य नाही.”

“राज्यकर्तेच रस्त्यावर उतरून समाजात कटुता निर्माण करत आहेत”

“आज सत्ताधारी पक्ष अशा सर्व गोष्टींना प्रोत्साहन देत आहे. राज्यकर्त्यांची जबाबदारी राज्यात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करणे आहे. मात्र, राज्यकर्ते व त्यांचे सहकारी रस्त्यावर उतरायला लागले आणि त्यामुळे समाजात जातीत कटुता निर्माण झाली तर हे चांगलं लक्षण नाही,” असं मत शरद पवारांनी व्यक्त केलं.

हेही वाचा : भाजपा नेत्यांकडून एकेरी उल्लेख करत टीका, शरद पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया, म्हणाले…

“औरंगाबादमध्ये औरंगजेबाचा फोटो दाखवला म्हणून पुण्यात दंगल करण्याचं काय कारण?”

“समाजात कटुता निर्माण केली जात आहे. औरंगाबादमध्ये कुणीतरी औरंगजेबाचा फोटो दाखवला. त्यासाठी पुण्यात दंगल करायचं काय कारण आहे. पुण्यात आंदोलन करायचं काय कारण आहे,” असंही पवारांनी नमूद केलं.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-06-2023 at 13:36 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×