Sharad Pawar : मविआचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण आणि नेमका ठरणार कसा? शरद पवारांनी उत्तर दिलं म्हणाले, “आम्ही..”

Sharad Pawar : निवडणुकीत करेक्ट कार्यक्रम कुणाचा करणार? हे विचारताच शरद पवारांनी त्यावर उत्तर दिलं आहे.

Sharad Pawar News
शरद पवार यांनी मविआचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण आणि कसा ठरणार हे सांगितलं आहे. (फोटो-शरद पवार, फेसबुक पेज)

Sharad Pawar: महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत उत्तम कामगिरी करत ३० जागा जिंकल्या. ज्यानंतर महाविकास आघाडीचा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जिंकण्याचा आत्मविश्वास दुणावला आहे. महाविकास आघाडीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार? याच्याही चर्चा सुरु आहेत. महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण आहे कसा ठरणार? हे शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी स्पष्ट केलं आहे.

ऑगस्ट महिन्यात उद्धव ठाकरेंनी काय म्हटलं होतं?

ऑगस्ट महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या मेळाव्यात हे जाहीर केलं की काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यापैकी कुणीही मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा मी त्यांना पाठिंबा देईन. दुसरीकडे काँग्रेसने यावर भूमिका स्पष्ट केली आहे. मुख्यमंत्री कोण होईल ते आम्ही नंतर ठरवू काँग्रेसने आत्तापर्यंत कधीही चेहरा ठरवून निवडून लढलेली नाही. आता शरद पवार यांनी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण आणि तो कसा ठरणार यावर भाष्य केलं आहे. तसंच शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी करेक्ट कार्यक्रम हा शब्द वापरत ती जबाबदारी कुणाला दिली आहे ते प सांगितलं आहे.

हे पण वाचा- Sharad Pawar: देवेंद्र फडणवीसांनी सुरत लुटीबाबत केलेल्या विधानाबद्दल काय म्हणाले शरद पवार?

करेक्ट कार्यक्रमाची जबाबदारी जयंत पाटील यांच्यावर

निवडणुकीत करेक्ट कार्यक्रम कुणाचा करणार? असं विचारलं तेव्हा शरद पवार म्हणाले आमच्या पक्षात ती जबाबदारी मी जयंत पाटील यांना दिली आहे. असं उत्तर शरद पवार यांनी दिलं आहे. शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी आज कोल्हापुरात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी हे उत्तर दिलं. तसंच मविआच्या मुख्यमंत्रिबाबत त्यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

मविआचा मुख्यमंत्री कोण असेल?

मविआचा मुख्यमंत्री कोण असेल? हे विचारलं असता शरद पवार म्हणाले, “देशात आणीबाणी लागली होती त्यानंतर निवडणूक झाली. त्यावेळी कुठलाही चेहरा पुढे केला गेला नव्हता. विरोध करण्यासाठी एकत्र या असं सांगण्यात आलं, लोक एकत्र आले. निवडणुकीनंतर मोरारजी देसाई यांचं नाव पुढे आलं आणि ते पंतप्रधान झाले. आत्ताच मुख्यमंत्री कोण होणार ते जाहीर करण्याची गरज नाही. निवडणूक झाल्यानंतर आम्ही एकत्र बसू आणि मुख्यमंत्री कोण होईल तो चेहरा ठरवू. कोणत्या पक्षाचे किती उमेदवार निवडून येतील हे पहावं लागले. त्यानंतर एकत्र बसून निर्णय घेऊ.” असं शरद पवार ( Sharad Pawar ) म्हणाले.

जागावाटपाचा निर्णय दोन-तीन दिवसांत

‘‘दोन ते तीन दिवसात महाविकास आघाडीचे एकत्र बसतील. जागा वाटपाबाबत निर्णय होईल. डाव्या विचांराचे काही पक्ष महत्त्वाचे आहेत त्यांनी. आम्हाला सहकार्य केले त्यांना विचारात घेऊन आम्ही सुरुवात करणार आहोत. राज्यात तिसऱ्या आघाडीचा प्रयोग सुरू आहे याची माहिती मला नाही’’ असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sharad pawar told who will be the mva cm after election also told formula scj

First published on: 04-09-2024 at 19:33 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
Show comments