महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक २० नोव्हेंबरला पार पडणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना रंगणार आहे. यात कुणाचा विजय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. महाविकास आघाडीने आम्ही १८० जागा जिंकणार असा दावा काही दिवसांपूर्वी केला आहे. तर आजच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महायुतीला १७० जागा मिळतील असा विश्वास व्यक्त केला आहे. प्रचारसभांचा धडाका सुरु आहे. शरद पवार यांनी नाशिकमधल्या कळवणमध्ये सभा घेतली. त्यात मोदींना ४०० जागा का जिंकायच्या होत्या ते कारण सांगितलं आहे.

काय म्हणाले शरद पवार?

“लोकसभेची निवडणूक झाली त्यात महाविकास आघाडीला तुम्ही निवडून दिले. देशभर पंतप्रधान ४०० हून अधिक जागा निवडून द्या अशी मागणी करत होते. पन्नास टक्के जागा निवडून आल्या की सरकार स्थापन होते. याआधी संख्या कमी असतानाही काही सरकार टिकली आहेत. मात्र भाजपला ४०० पेक्षा जास्त जागा कशासाठी हव्या होत्या? असा प्रश्न पडला होता. त्यावेळी आम्ही खोलात गेलो, मग कळले संविधान बदलायचे आहे. त्यासाठी ४०० पेक्षा अधिक खासदारांची मागणी करत होते”, असा हल्लाबोल शरद पवार यांनी केला.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

हे पण वाचा- Sharad Pawar : “आम्हाला ते सहन करावं लागेल”, वणीमधील ‘त्या’ घटनेवरून शरद पवारांची हतबल प्रतिक्रिया

आम्ही विरोधकांची आघाडी केली म्हणून..

आम्ही विरोधी पक्षांना एकत्र केलं आणि आघाडी स्थापन करत त्याला इंडिया आघाडी नाव दिलं. काँग्रेस, आम्ही, माकप आणि शिवसेनेचे लोक त्यात होते. देशातील लोकांना सांगितलं की ४०० जागा दिल्या तर संविधानाला धक्का लागेल. मला आनंद आहे, सगळ्यांनी धोका ओळखला आणि ही संख्या ओलांडू दिली नाही. चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनी त्यांना साथ दिली म्हणून सरकार आले, पण ते घटनेला धक्का लावू शकत नाहीत, असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

लाडकी बहीण योजनेला विरोध नाही, सुरक्षेचं काय?

महायुती सरकारने महिलांच्यासाठी लाडकी बहीण योजना आणली, आमचा त्याला विरोध नाही. मात्र मदत करा पण संरक्षण करण्याची जबाबदारी टाळता येणार नाही. काही महिन्यांपूर्वी शाळेत मुली सुरक्षित नाही हे आपण पाहिलं. ६०० पेक्षा अधिक मुली कुठं गेल्या याचा पत्ता लागत नाही. ज्यांच्या हातात सत्ता होती त्यांना सुरक्षा देता येत नाही. आम्ही मुलींच्या संरक्षणाच्या बाबतीत काळजी घेणार आहोत, आर्थिक मदत सुद्धा करणार आहोत. एसटीचे तिकीट काढायची गरज नाही, मोफत प्रवास देणार आहोत, असं आश्वासनही शरद पवारांना यावेळी दिलं.

Story img Loader