अजित पवार यांचं २८ जानेवारीला विमान अपघातात निधन झालं, २९ जानेवारीला त्यांना अखेरचा निरोप महाराष्ट्राने दिला. अजित पवारांच्या मृत्यूनंतर राष्ट्रवादी कांँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चा सुरु आहेत. दरम्यान शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी शरद पवार २०२२ मध्येच एनडीए बरोबर येणार होते असा दावा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी विलीनीकरणाच्या चर्चा नाकारल्या आहेत. अजित पवारांची इच्छा महापालिकांमध्ये एकत्र येण्याची होती, असंही त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान आता मंत्री संजय शिरसाट यांनी २०२२ मध्ये शरद पवार एनडीएसह येणार होते असं म्हटलं आहे.
राष्ट्रवादी पक्ष एकत्र येण्याच्या चर्चा का होत आहेत?
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचं विलीनीकरण होईल अजित पवारांचीच तशी इच्छा होती वगैरे चर्चा सुरु झाल्या आहेत. दरम्यान सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांनी या चर्चा नाकारल्या आहेत. अजित पवार २०२३ मध्ये सत्तेत सहभागी झाले होते आणि एनडीएसह रहावं हीच त्यांची भूमिका होती. दोन्ही राष्ट्रवादी कांँग्रेस पक्ष एकत्र आले पाहिजेत ही भूमिका त्यांनी महापालिका निवडणूक आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी मांडली होती असा दावा या दोन्ही नेत्यांनी केला आहे. दरम्यान संजय शिरसाट यांनी शरद पवार २०२२ मध्ये एनडीएत येणार होते सगळं काही ठरलं होतं असा दावा केला आहे.
संजय शिरसाट काय म्हणाले?
२०२२ मध्ये एनडीएमध्ये येण्यासाठी शरद पवारांनी प्रयत्न केला होता. या गोष्टी नाकारता येणार नाहीत. कोणती खाती घ्यायची, कोणती खाती नकोत यावर सगळी चर्चा झाली होती. हे सगळं त्या काळात होतं. त्यानंतर मधल्या काळात त्यांच्या चर्चा झाल्या आहेत की नाही हे मला माहीत नाही. जोपर्यंत शरद पवार स्पष्टीकरण देत नाहीत तोपर्यंत यावर भाष्य करणं योग्य ठरणार नाही. असा दावा संजय शिरसाट यांनी केला आहे. आता याबाबत शरद पवार काही भाष्य करणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
२०२३ मध्ये अजित पवार एनडीएत
जुलै २०२३ मध्ये अजित पवार महायुतीत आले आणि त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. शरद पवार यांनी आता निवृत्त व्हावं असंही त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा सामना झाला. ही निवडणूक सुप्रिया सुळेंनी जिंकली. दरम्यान अजित पवार बारामतीतून २०२४ च्या विधानसभेला पुन्हा एकदा आमदार झाले. आता दोन पक्ष विलीनीकरणाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. मात्र शिरसाट यांनी वेगळाच दावा केला आहे.

