आíथक समस्येमुळे एकीवर खेळ थांबवण्याची वेळ अलिबागच्या योगिता आणि दीपाली या शिळधणकर भगिनींनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर सायकिलग या क्रीडा प्रकारात दबदबा निर्माण केला आहे. राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पातळीवरील सातत्यपूर्ण योगदान देणाऱ्या या भगिनींना नुकतेच राज्य सरकारच्या शिवछत्रपती पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. कबड्डीची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रायगडात त्यांनी सायकलिंग क्रीडा प्रकारात प्रावीण्य मिळवले आहे. पण आíथक समस्यांमुळे योगिता हिला खेळ थांबवण्याची वेळ आली आहे. अलिबाग तालुक्यातील धोकवडे या छोटय़ाश्या गावातील दोन मुली आज सर्वासाठी कुतुहलाचा विषय ठरत आहे. कारण एकाच कुटुंबातील या दोन मुलींचा राज्य सरकारने एकाच वेळी एकच शिवछत्रपती पुरस्कार देऊन गौरव केला आहे. सायकिलगसारख्या काहीशा दुर्लक्षित पण खíचक क्रीडा प्रकारात प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनत करून त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. गावातील लहानलहान सायकिलग स्पर्धा ते राष्ट्रीय स्पर्धा यातील शिळधणकर भगिनींचा प्रवास थक्क करणारा आहे. अपार मेहनत आणि क्रीडा प्रबोधिनीचे मार्गदर्शन यामुळे दोन्ही बहिणींनी या क्रीडा प्रकारात स्वत:चा दरारा निर्माण केला आहे. राष्ट्रीय पातळीवरील १५हून जास्त स्पर्धामध्ये दोघींनी राज्याचे प्रतिनिधित्व केले आहे. एवढेच नव्हेतर सायकलिंगच्या राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्पर्धामध्ये दीपाली हिने तब्बल २३ पदकांची कमाई केली असून, त्यात ६ सुवर्ण पदकांचा समावेश आहे, तर योगिता हिने १३ पदकांची कमाई केली आहे. यात ७ रौप्य आणि ६ कांस्य पदकांचा समावेश आहे. लहानपणापासून सायकिलगची आवड असणाऱ्या या भगिनींना काकांनी स्पर्धात्मक सायकिलग प्रकारात उतरण्याचा सल्ला दिला. जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून आयोजित होणाऱ्या स्पर्धामध्ये दोन वेगवेगळ्या गटांत दोघींनी पहिला क्रमांक पटकावला. यामुळे त्यांची निवड राज्यस्तरीय स्पर्धासाठी करण्यात आली. तिथेही त्यांनी यश संपादित केल्याने २००८ मध्ये त्यांची निवड क्रीडा प्रबोधिनीसाठी करण्यात आली. हा दोघींच्या सायकिलग करिअरसाठी कलाटणी देणारा क्षण होता. तेव्हापासून आजतागायत दोन्ही बहिणींनी सायकिलगच्या विविध स्पर्धा जिंकल्या. आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करता यावे अशी दोघींचीही इच्छा आहे. मात्र त्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर उपयुक्त ठरतील अशा विदेशी बनावटीच्या सायकल त्यांना लागणार आहेत. दीपाली हिची कामगिरी लक्षात घेऊन आम्ही तिला सव्वा लाखाची सायकल घेऊन दिली आहे. मात्र योगितासाठी आता आणखी एक सायकल घेणे शक्य नाही. त्यामुळे इच्छा नसूनही योगिताने आता थांबावे असे मला वाटते. तुकाराम शिळधणकर, दीपाली आणि योगिताचे वडील आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पध्रेत सहभागी व्हायचे असेल तर विदेशी बनावटीच्या महागडय़ा आणि वजनाने हलक्या सायकली हव्या. या सायकलींची किंमत ६ ते १४ लाखांच्या घरात आहे. त्यामुळे सध्यातरी आम्हाला या सायकली घेणे शक्य नाही. योगिता शिळधणकर, छत्रपती पुरस्कार विजेती सायकलपटू कबड्डीच्या पंढरीत गुणवान सायकलपटू तयार होणे ही रायगडसाठी मोठी गौरवाची गोष्ट आहे. पण आíथक समस्यांमुळे जर अशा गुणवान खेळाडूंचे करिअर अडचणीत येत असेल तर ही एक दुर्दैवाची गोष्ट आहे. मंगेश माळी, क्रीडाप्रेमी