"माझ्या मतदारसंघात भाजपाशी युती नको, कारण...", शिंदे गटातील मंत्री अब्दुल सत्तारांचं मोठं विधान | Shinde faction Minister Abdul Sattar say do not ally with BJP in my constituency | Loksatta

“माझ्या मतदारसंघात भाजपाशी युती नको, कारण…”, शिंदे गटातील मंत्री अब्दुल सत्तारांचं मोठं विधान

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील मंत्री अब्दुल सत्तार यांनी “माझ्या मतदारसंघात भाजपाशी युती नको,” असं मोठं विधान केलं आहे.

“माझ्या मतदारसंघात भाजपाशी युती नको, कारण…”, शिंदे गटातील मंत्री अब्दुल सत्तारांचं मोठं विधान
अब्दुल सत्तार, एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस

शिवसेनेतील बंडखोरीनंतर महाविकासआघाडी सरकार कोसळलं आणि शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं. त्यानंतर आगामी सर्व निवडणुका शिंदे गट आणि भाजपा युतीत लढेल असं दोन्ही पक्षांमधील नेत्यांनी अनेकदा सांगितलं. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील मंत्री अब्दुल सत्तार यांनी “माझ्या मतदारसंघात भाजपाशी युती नको,” असं मोठं विधान केलं आहे. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार असताना अब्दुल सत्तार यांनी केलेल्या या विधानानंतर चर्चांना उधाण आलं आहे.

अब्दुल सत्तार म्हणाले, “माझ्या मतदारसंघात भाजपाशी युती नको. या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत व्हावी. माझ्याच नाही, तर ज्या ज्या मतदारसंघात माझ्या मतदारसंघाप्रमाणे परिस्थिती असेल त्या त्या मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढती करण्यावर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी विचार करावा. शेवटी निवडून आल्यावर सत्ता स्थापन करताना आपण सोबत राहू.”

“दोघांमध्ये मैत्रीपूर्ण लढत झाली पाहिजे”

“दिल्लीत आणि मुंबईतसह जिल्ह्यात, महापालिकेत, जिल्हा परिषदेत सोबत राहू. स्थानिक पातळीवर एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजपा असे दोघेच आहोत. त्यामुळे या दोघांमध्ये मैत्रीपूर्ण लढत झाली पाहिजे. जो निवडून येईल तो सत्ताधाऱ्यांचा म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचाच कार्यकर्ता असेल.”

“मला कुत्रं निशाणी दिली तरी मी निवडून येईन”

निवडणुकीतील चिन्ह आणि आपल्या मतदारसंघातील आपली ताकद यावर बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले, “मी एकनाथ शिंदेंना सांगितलं की मला कुत्रं निशाणी दिली तरी मी निवडून येईन. कमकुवत माणसाला काहीतरी आधार लागतो. मी कार्यकर्ता आहे आणि जो कार्यकर्ता असतो त्याला कधीही कोणत्याही गोष्टीची भीतीच वाटत नाही. कार्यकर्ता पद कुणी हिसकावूनही घेऊ शकत नाही. आमदार, खासदार, मंत्रीपद निघून जाईल, आणखी काही पदं असतील ती जातील, पण कार्यकर्ता हे पद कधीही जात नाही.”

हेही वाचा : “उद्धव ठाकरेंनी CM शिंदेंचं नेतृत्व मान्य करत जुळवून घ्यावं, कारण…”; शिंदे गटातील अब्दुल सत्तारांचा सल्ला

“जसंजसं काम केलं की त्याला जनतेची ताकद मिळते, आशीर्वाद मिळतो. त्यामुळे राजकारणाच्या ट्रॅकवर कितीही गतीरोधक आले तरी गाड्या सरळ मुंबईपर्यंत जातात. दुसरीकडे जनता जनार्दनाने स्वीकारलं नाही, तर पालूतभर वखरावरही कुणी ठेवत नाही,” असंही अब्दुल सत्तार यांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
“…तर खपवून घेतले जाणार नाही,” टक्केवारीचा उल्लेख करत फडणवीसांनी घेतली स्पष्ट भूमिका; म्हणाले “दोन वर्षांत…”

संबंधित बातम्या

VIDEO: भाषण करताना स्टुलवर उभे राहिल्याने मनसेची टीका, सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर, म्हणाल्या, “माझ्या पायाखाली…”
“…म्हणून शिवसेनेचं सरकार घालवण्यात आलं”, संजय राऊतांचं मोठं विधान, शिंदे सरकारला केलं लक्ष्य!
“रात्रीच्या अंधारात आमदारांना सुरतला पाठवता येऊ शकतं, मग…”; सीमाप्रश्नावरून रोहित पवारांची मुख्यमंत्र्यांवर खोचक टीका
VIDEO: ‘अपना एक स्टाईल है, इलाका तुम्हारा और धमाका हमारा’, मनसेच्या इशाऱ्यावर सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर, म्हणाल्या…
Maharashtra Karnataka Dispute: “कानडी जनता जर आक्रमक भूमिका घेत असेल, तर…,” एकनाथ खडसेंचं जाहीर आव्हान

व्हिडिओ

ताज्या बातम्या
शिंदे सरकारला ‘नामर्द’ म्हणणाऱ्या राऊतांना शंभूराज देसाईंचा इशारा; म्हणाले, “तोंड आवरावं, अन्यथा पुन्हा…”
पुणे: भूमी अभिलेख भरती परीक्षेचा निकाल १५ डिसेंबरला; यंदा प्रथमच प्रतीक्षा यादी
मुंबई: अध्ययन अक्षमता असलेल्या विद्यार्थ्याला उच्च न्यायालयाचा दिलासा; पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन पदवी अभ्यासक्रमात प्रवेश देण्याचे आदेश
आधी निषेध मग लग्न! खराब रस्त्याला कंटाळलेला नवरदेव लग्न सोडून थेट आंदोलनात पोहचला
Video: राम चरणने शहीद कर्नल संतोष बाबूंच्या मुलांसह घेतला सेल्फी; अभिनेत्याच्या कृतीने जिंकली नेटकऱ्यांची मनं