पिक विमा प्रश्नावर आमदार बच्चू कडू यांची आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी कृषी विभाग आणि विमा कंपनीचे अधिकारी शेतकऱ्यांच्या बाबतीत उदासीन असल्याचा आरोप केला. तसेच यावर संतापून त्यांनी लाखो शेतकऱ्यांसाठी पिक विमा अधिकाऱ्याच्या थोबाडात मारण्यात काहीही वाईट नसल्याचं वक्तव्य केलं. बच्चू कडूंनी अमरावतीत शेतकऱ्यांच्या पिक विमा प्रश्नावर कृषी विभागाची बैठक बोलावली. यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
बच्चू कडू म्हणाले, “सरकार आपलं असलं, तरी कंपनी ही कंपनी आहे. कधी-कधी कंपनी सरकारच्या दप्तरी कायद्यात ऐकत नसेल, तर लाखो शेतकऱ्यांसाठी एखादी थोबाडीत मारली तर त्यात वाईट काय आहे. आम्ही काय रक्त काढतो म्हटलं नाही. थोबाडीत मारणं म्हणजे चापट मारण्यासारखं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होत असेल, तर ते करायला काही हरकत नाही.”
व्हिडीओ पाहा :
हेही वाचा : “…तर घरात घुसून मारेन”, रवी राणांच्या वक्तव्यावर बच्चू कडूंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “तीन वाजता…”
“…तर अशावेळी काही धमक्या देणं फार गरजेचं असतं”
“प्रशासकीय यंत्रणेत सचिव, कृषी सचिव आणि आयुक्त यांच्याकडूनच जी युद्धस्तरावर कारवाई व्हायला पाहिजे ती होत नाही. खाली लोकांना आंदोलन करावं लागतं. काही शेतकऱ्यांचे जीव जाणार आणि मग यंत्रणा कारवाई करणार असेल, तर अशावेळी काही धमक्या देणं फार गरजेचं असतं,” असंही बच्चू कडूंनी नमूद केलं.
