राज्यात सध्या ‘खरी शिवसेना कोण’ यावरुन शिंदे गट आणि उद्धव ठाकरेंमध्ये वाद सुरु असताना दोन्ही बाजूंनी दावे-प्रतिदावे केले जात आहेत. दुसरीकडे, शिंदे गट आणि शिवसेनेत मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेशदेखील होत असून, आपली बाजू भक्कम आहे असं दाखवण्याचा प्रयत्न होत आहे. नुकतंच बाळासाहेब ठाकरेंचे सेवक चम्पासिंग थापा यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने शिवसेनेला धक्का बसला आहे. त्यातच आता शिंदे गटातील आमदार गुलाबराव पाटील यांनी मोठा दावा केला आहे. ते धुळ्यातील सभेत बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाले गुलाबराव पाटील –

बाळासाहेब ठाकरे यांचे सेवक चम्पासिंग थापा यांच्यानंतर आता उद्धव ठाकरेंचे स्वीय्य सहाय्यक मिलिंद नार्वेकरदेखील शिंद गटात सहभागी होतील असा दावा गुलाबराव पाटील यांनी केला आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

PHOTO : चंपासिंग थापांचा शिंदे गटात प्रवेश; बाळासाहेबांचे विश्वासू असलेले थापा आहेत तरी कोण? जाणून घ्या

“गुलाबराव पाटलांनr ५० खोके घेतले मान्य आहे. पण चम्पासिंग थापाने काय केलं? ज्या थापाने त्याचं संपूर्ण आयुष्य बाळासाहेबांच्या चरणी अर्पण केलं होतं, तोदेखील यांना सोडून आला. यांनी आता टीका करायची तरी कशी. थापा गेला, आता मिलिंद नार्वेकर येत आहेत,” असं गुलाबराव पाटील म्हणाले आहेत.

एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतरही मिलिंद नार्वेकर यांच्यासोबत मात्र त्यांचा संवाद कायम आहे. एकनाथ शिंदेंनी गणेशोत्सवात मिलिंद नार्वेकर यांच्या घरी जाऊन गणपतीचं दर्शन घेतलं होतं. एकनाथ शिंदे सूरतमध्ये असताना उद्धव ठाकरेंनी चर्चेसाठी ज्यांना पाठवलं होतं, त्यामध्ये मिलिंद नार्वेकर यांचाही समावेश होता.

चम्पासिंग थापा उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सेवेकरी म्हणून ओळखले जाणारे चम्पासिंग थापा यांनीही उद्धव ठाकरे यांची साथ सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला आहे. एकेकाळी मातोश्रीमधील एक सदस्य म्हणून ओळख असलेल्या थापा यांनी घेतलेल्या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या असुन, उद्धव ठाकरेंसाठी हा एक धक्का मानला जात आहे. याचबरोबर बाळासाहेबांचे सेवेकरी असलेले मोरेश्वर राजे यांनीही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सेवेकरी म्हणून चम्पासिंग थापा हे ओळखले जातात. बाळासाहेब हे राज्यात दौरे किंवा सभेनिमित्त जायचे, त्यावे‌ळेस त्यांच्यासोबत थापा हे सावलीसारखे उभे असायचे. बाळासाहेबांच्या प्रकृतीची काळजी घेणे, त्यांना औषधे देणे आणि जेवण देणे अशी कामे ते करीत होते. मातोश्रीमधील एक सदस्य म्हणून ते ओळखले जायचे. बाळासाहेब यांच्या निधनानंतर थापा यांनी मातोश्रीसोबतच राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. असे असतानाच, त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाण्यातील टेंभीनाका येथील देवीच्या मिरवणुकीदरम्यान भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shinde faction mla gulabrao patil on shivsena uddhav thackeray milind narvekar sgy
First published on: 01-10-2022 at 08:39 IST