scorecardresearch

‘साहेब गद्दारी झाल्यापासून रोज…’, संतोष बांगर समर्थकाने शिवीगाळ केल्यानंतर महिला पदाधिकाऱ्याची तक्रार, ठाकरे म्हणाले “एक काम कर…”

संतोष बांगर समर्थकाची महिला पदाधिकाऱ्याला शिवीगाळ, उद्धव ठाकरेंनी केला फोन, म्हणाले “तुझा मेसेज मिळाला, एक काम कर…”

‘साहेब गद्दारी झाल्यापासून रोज…’, संतोष बांगर समर्थकाने शिवीगाळ केल्यानंतर महिला पदाधिकाऱ्याची तक्रार, ठाकरे म्हणाले “एक काम कर…”
संतोष बांगर समर्थकाची युवासेनेच्या महिला पदाधिकाऱ्याला शिवीगाळ

शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर सध्या काही ना काही कारणामुळे सतत चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी संतोष बांगर यांचा ताफा शिवसैनिकांनी अडवल्यानंतर वाद निर्माण झाला होता. त्यानंतर संतोष बांगर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली होती. पण आता संतोष बांगर आपल्या एका समर्थकामुळे चर्चेत असून, वादात अडकण्याची शक्यता आहे. महत्त्वाचं म्हणजे, उद्धव ठाकरे यांनी स्वत: या प्रकरणाची दखल घेतली असून महिला पदाधिकाऱ्याची विचारपूस केली आहे.

संतोष बांगर यांच्या कथित समर्थकाने युवासेनेच्या महिला पदाधिकाऱ्याला फोन करुन शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये हा समर्थक अयोध्या पोळ यांच्याशी आक्षेपार्ह भाषेत बोलत असल्याचं ऐकू येत आहे.

“गद्दार म्हणू नका नाहीतर कानाखाली वाजवू” म्हणणाऱ्या संतोष बांगर यांना शिवसैनिक तरुणीचं प्रत्युत्तर; म्हणाली, “भायखळ्यातून फोन…!”

फेसबुकवरील एका पोस्टबाबत जाब विचारताना हा समर्थक अयोध्या पोळ यांना वारंवार हिंगोलीत येण्याचं आवाहन देत असल्याचंही यात दिसत आहे. ‘संतोष बांगर तुझा बाप आहे’, अशा भाषेत हा समर्थक त्यांच्याशी संवाद साधतो.

दरम्यान ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी अयोध्या पोळ यांच्याशी संवाद साधत विचारपूस केली. यावेळी उद्धव ठाकरेंनी त्यांनी पोलिसात तक्रार देण्याचा सल्ला दिला.

उद्धव ठाकरे आणि अयोध्या पोळ यांच्यातील संवाद –

उद्धव ठाकरे – तुझा मेसेज मिळाला तो टेलिफोनचा, फक्त काळजी घे.

अयोध्या पोळ – हो साहेब, मला ना जेव्हापासून ही गद्दारी झाली तेव्हापासून रोज प्रॉब्लेम आहे.

उद्धव ठाकरे – एक काम कर, पहिलं म्हणजे रितसर तक्रार करुन ठेव. करणार काही नाहीत, फक्त ते असंच डिवचून-चिडवून चूक करायला लावतील. सोबत कोणी सैनिक वैगेरे असतात का?

अयोध्या पोळ – मुंबईत मी एकटीच असते, बाकी सगळे परभणी जिल्ह्यात पालममध्ये असतात. मी भायखळ्यात १९ व्या मजल्यावर राहते. २३ व्या मजल्यावर रेकी करण्यासाठी काही मुलींना ठेवलं आहे.

उद्धव ठाकरे – एक काम कर, तू मुंबईत असतेस ना, मी सीपींना सांगतो. सीपींकडे सुद्धा रितसर तक्रार करुन ठेव.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या