"भुंकणारे कुत्रे आणि ते संजय राऊतांचे..." ठाकरे गटाच्या नेत्यावर संजय शिरसाटांचं टीकास्र! | shinde group leader sanjay shirsat on sharad koli shivsena rmm 97 | Loksatta

“भुंकणारे कुत्रे आणि ते संजय राऊतांचे…” ठाकरे गटाच्या नेत्यावर संजय शिरसाटांचं टीकास्र!

शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाच्या नेत्यावर शिवराळ भाषेत टीका केली आहे.

“भुंकणारे कुत्रे आणि ते संजय राऊतांचे…” ठाकरे गटाच्या नेत्यावर संजय शिरसाटांचं टीकास्र!
फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम

शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाच्या नेत्यावर शिवराळ भाषेत टीका केली आहे. त्यांनी ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांचा उल्लेख भुंकणारे कुत्रे असा केली. ते संजय राऊतांचे पिल्ले आहेत, असंही शिरसाट म्हणाले. बीड येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शिरसाट यांनी ही टीका केली आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते शरद कोळी यांनी अलीकडे शिंदे गटाच्या नेत्यांवर बोचरी टीका केली होती. त्यांनी एका जाहीर भाषणात शिंदे गटातील नेत्यांचा उल्लेख लांडगे आणि कुत्रे असा केला होता. तसेच येत्या काळात महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांचीच एकहाती सत्ता येईल, असंही शरद कोळी म्हणाले होते. शरद कोळी यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय शिरसाट यांनी शिवराळ भाषेचा वापर केला आहे.

हेही वाचा- “कर्नाटक सरकार अतिरेकी भूमिका घेत असून…” सीमावादावर दिलीप वळसे-पाटलांचं विधान

शरद कोळी यांनी केलेल्या टीकेबाबत विचारलं असता, संजय शिरसाट म्हणाले, “हे शरद कोळी कोण आहेत? शरद कोळीसारखे भुंकणारे कुत्रे… ते संजय राऊतांचे पिल्ले आहेत. काल आलेली लोक काहीही बोंबलतील. त्यांना एवढं गांभीर्याने घ्यायची गरज नाही. आम्ही वाघाची औलाद आहोत, म्हणून आम्ही उठाव करू शकलो. तुमच्यात दम असेल तर तुम्हीही करून दाखवा. तुम्हाला आयुष्यभर कुणाची तरी चाटायची आहे, ते चाटायचं काम करत आहेत” असंही शिरसाट म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-12-2022 at 21:25 IST
Next Story
Maharashtra-Karnataka Border Dispute : “गृहमंत्र्यांनी पुढाकार घेण्याची गरज; अशावेळी केंद्र जर मूग गिळून गप्प बसत असेल, तर…” – अंबादास दानवेंचं विधान!