कर्नाटकचे मुख्यमंत्री रोज महाराष्ट्रावर आगपाखड करून डिवचत आहेत. कर्नाटकने जत तालुक्यातील गावांना पाणीही सोडले आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांनी जलसमाधी घेतली पाहिजे, अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली होती.

स्वाभिमानासाठी शिवसेना सोडत असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले होते. कर्नाटककडून डिवचले जात असताना त्यांचा स्वाभिमान कुठे हरवला. आता खरी क्रांती करण्याची वेळ आली असताना ते मूग गिळून बसले आहेत, असा टोलाही संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदारांना लगावला होता. याला आता सडेतोड प्रत्युत्तर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी दिलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

Bhaskar Jadhav On MNS Raj Thackeray
‘मनसेने महायुतीला पाठिंबा दिला की द्यायला लावला?’, भास्कर जाधव यांचा सवाल
Loksatta anvyarth Aam Aadmi Party Delhi Chief Minister Arvind Kejriwal arrested by ED in liquor scam
अन्वयार्थ: आता राजकीय ‘आप’-घात?
Pramod Patil, Vaishali Darekar
मनसेतून बाहेर पडलेल्या गद्दारांना कल्याण लोकसभेत मदत नाही, आमदार प्रमोद पाटील यांचा वैशाली दरेकरांना इशारा
Vikas Mahant came in costume of Narendra Modi in meeting of Thane Lok Sabha Constituency
ठाण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी अवतरले पण, ते खरे नसल्याचे कळताच…

हेही वाचा : “सोलापुरात कर्नाटक भवन बांधणार असाल, तर आम्हाला…”, संजय राऊतांचे मुख्यमंत्री बोम्मईंना प्रत्युत्तर

“संजय राऊतांना पिसाळलेला कुत्रा चावला आहे. दरवेळी नवीन वाद निर्माण करतात. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना तेव्हा तोंड का उघडलं नाही. झोपा काढत होता का? अडीच वर्ष तेव्हा सुचलं नाही. ज्या गोष्टी आपल्याला करत येत नाही, त्या दुसऱ्यांवर थोपवण्याचं काम सुरु आहे. संजय राऊतांकडून अजून अपेक्षा काय आहे,” असा प्रश्न संजय शिरसाट यांनी उपस्थित केला.

हेही वाचा : “शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना शिव्या देत असतील तर…”, संजय राऊतांचे शिंदे गटातील आमदारांना आव्हान

‘शिवसेना सोडून गेलेल्या आमदार, खासदारांच्या कपाळावर ‘गद्दार’ असा शिक्का लागला आहे,’ असे संजय राऊत यांनी म्हटल्याचं विचारलं असता संजय शिरसाट म्हणाले की, “गद्दार आमच्या कपाळावर लिहल्याचं ते म्हणत आहे. तुम्ही आम्हाला शिवसेना नका शिकवू, पक्षासाठी काय केलं, हे आमच्या जीवाला विचारा. पगारदार नोकर येऊन बोलत असतील, तर यांनी यांच्या नोकऱ्या कराव्यात. ‘सामना’चे संपादकपद सोडलं असून, मला भुंकायला ठेवलं आहे, असं त्यांनी सांगावे. पण, तुमच्या भुंकण्याने महाराष्ट्रात काही परिणाम होणार नाही,” असेही संजय शिरसाट यांनी म्हटलं.