शिवसेनेत बंडखोरी करत शिंदे गटात सामील झालेले कळमनुरीचे आमदार संतोष बांगर सातत्याने चर्चेत असतात. कधी आरोग्य अधिकाऱ्याला मारहाण, वीज कंपनीच्या अधिकाऱ्यास फोनवरून धमकावणे, पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ अशा घटना समोर आल्या आहेत. अशातच संतोष बांगर यांनी एका प्राचार्यांना मारहाण केली आहे. याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, बांगर यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय आहे प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मागील आठवड्यात घडली आहे. हिंगोलीतील तंत्रनिकेतन येथील प्राचार्यांना कार्यालयात जाऊन संतोष बांगर यांनी मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. याप्रकरणावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती घेऊन कारवाई करणार असल्याचं सांगण्यात आलं. यावर आता संतोष बांगर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

हेही वाचा : ‘आदित्य ठाकरेंना अनुभव नाही’ म्हणणाऱ्या दीपक केसरकरांना अरविंद सावंतांचे चोख प्रत्युत्तर; म्हणाले, “त्यांच्या दिव्याखाली…”

“याप्रकरणात माध्यमांनी प्राचार्य आणि उपप्राचार्यांना जाब विचारला आहे का? त्यांनी स्पष्टीकरण दिलं तर, मी निश्चित कुठंतरी चुकलेलो असावं. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहत आहे. येथे कोणी महिलेवर अत्याचार करत असेल, तर सहन करणार नाही. मग गुन्हा दाखल झाला तरी पर्वा नाही,” असं संतोष बांगर यांनी सांगितलं.

हेही वाचा : आमदार संतोष बांगरांकडून हिंगोलीतील प्राचार्यांना मारहाण; दीपक केसरकर म्हणाले, “बांगर साहेबांनी आता…”

तसेच, “सरकारमध्ये असल्याने आवाज उठवायचा नाही का? ही बाळासाहेब ठाकरेंची शिकवण नाही आहे. संपूर्ण प्रकरणाची उपमुख्यमंत्र्यांना माहिती दिली आहे. ज्या महिलेवर अन्याय होत होता, तिचा व्हिडीओही माझ्याजवळ आहे. मारहाण झाल्यावर प्राचार्यांनी तक्रार का केली नाही?,” असा सवालही संतोष बांगर यांनी उपस्थित केला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shinde group mla santosh banger clearification hingoli iti principal beat case ssa
First published on: 25-01-2023 at 15:58 IST