मुंबई : शिवसेनेचे आमदार फोडून राज्यातील सत्ता काबीज केल्यानंतर ठाकरे व पवार पक्षाचे खासदार आपल्या गोटात आणण्यासाठी एकीकडे ‘मिशन टायगर’ राबविले जात असताना दुसरीकडे शिंदे पक्षाने २०२९ मधील लोकसभा निवडणूकीच्या पक्ष बांधणीसाठी ४८ संर्पकप्रमुखांची घोषणा केली.
तीन वर्षानी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेने कंबर कसली आहे. शिंदे यांच्या आदेशाने राज्यातील ४८ लोकसभा मतदार संघांसाठी संपर्कप्रमुखांची नियुक्ती करण्यात आली. शिंदे यांचे शिष्य खासदार नरेश म्हस्के यांच्यावर भिवंडी व कल्याण लोकसभा मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली आहे.
शिंदे पुत्र खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्यावर ठाण्यासह मुंबईतील सहा मतदार संघात लक्ष घालण्यास सांगण्यात आले आहे. त्यांच्यासोबत योगेश कदम, निलेश राणे, आणि राहुल शेवाळे लोकसभा मतदार संघातील पक्ष बांधणी करणार आहेत.
इतर संर्पकप्रमुख असे आहेत. नंदुरबार- माजी आमदार शिरीष चौधरी, धुळे व दिंडोरी- शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, जळगाव-आमदार दिलीप लांडे, रावेर-आमदार तुकाराम काते, बुलढाणा – संजय सोनार, अकोला – माजी आमदार राजन साळवी, अमरावती – आमदार किशोर अप्पा पाटील,वर्धा – आमदार डॉ.मनीषा कायंदे, रामटेक – अनिल कोकीळ, नागपूर – माजी खासदार संजय निरुपम, भंडारा-गोंदिया – विलास चावरी, गडचिरोली, चिमूर – माजी मंत्री जगदीश गुप्ता, चंद्रपूर – आमदार कृपाल तुमाने, यवतमाळ वाशिम – शिवसेना उपनेत्या प्रिती बंड, हिंगोली – शिवसेना उपनेते आनंदराव जाधव, नांदेड – दत्ता दळवी, परभणी – भास्कर आंबेकर, जालना – खासदार संदिपान भुमरे, छत्रपती संभाजी नगर – विलास पारकर, नाशिक – आमदार सुहास कांदे, पालघर – पांडुरंग पाटील, रायगड – अनिल नवघरे कोल्हापूर, मावळ व पुणे लोकसभा – मंत्री उदय सामंत, बारामती – किरण लांडगे, शिरुर – आमदार शरद सोनवणे, अहिल्यानगर शिवसेना सचिव राम रेपाळे, शिर्डी – खासदार डॉ. ज्योती वाघमारे, बीड – मनोज शिंदे, धाराशिव – माजी खासदार उन्मेष पाटील, लातूर – मंगेश कुडाळकर, सोलापूर – खासदार धैर्यशील माने, माढा – चंद्रहार पाटील, सांगली – योगेश जानकर, सातारा – शरद कणसे, रत्नागिरी – राजेश मोरे, सिंधूदुर्ग – बाळा चिंदरकर, हातकणंगले – आमदार सुहास बाबर यांची नेमणूक करण्यात आली आहे.
