मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट विरुद्ध शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गटामध्ये सुरु असणाऱ्या न्यायालयीन लढाईमध्ये पहिला निकाल शिंदे गटाच्या बाजूने लागला आहे. खरी शिवसेना कोणाची यावर निवडणूक आयोगाला निर्णय घेण्याचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी झालेल्या सुनावणीमध्ये मोकळा करुन दिल्यानंतर शिंदे गटाने आता दसरा मेळाव्याची तयारी सुरु केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने मागील आठवड्यामध्ये उद्धव ठाकरे गटाला दसरा मेळाव्यासाठी दादारमधील शिवाजी पार्कच्या वापराची परवानगी दिल्यानंतर आता वांद्रे-कुर्ला संकुल येथे शिंदे गटाचा मेळावा होणार आहे. पुढील आठवड्यात वांद्रे-कुर्ला संकुलात होणारा दसरा मेळावा अधिक भव्य करण्याचा निर्धार शिंदे गटाने केला असून याच निमित्त शिंदेंच्या निवासस्थानी शिंदे गटातील आमदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना शिंदे गटाचे प्रवक्ते आणि कॅबिनेट मंत्री दिपक केसरकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख पदाबद्दल मोठं विधान केलं आहे.

नक्की वाचा >> Shinde vs Thackeray: “ते लोक आईवर…”; रश्मी ठाकरेंसंदर्भात शिंदे गटाने केलेल्या दाव्यावरुन आदित्य ठाकरे संतापले

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खरी शिवसेना कोणाची यावर केंद्रीय निवडणूक आयोगासमोरच सुनावणी होईल यासाठी सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला आहे. निवडणूक आयोगासमोरील या सुनावणीला स्थगिती देण्यास मंगळवारी न्यायालयाने नकार दिला. या निकालामुळे शिंदे गटामध्ये उत्साह असून त्यांच्या या न्यायालयीन लढाई जिंकण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. गेल्या आठवड्यात दसरा मेळावा शिवाजी पार्कमध्ये आयोजित करण्यास शिवसेनेस परवानगी मिळाल्याने शिंदे गट काहीसा अस्वस्थ होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर शिंदे गट जोमाने दसरा मेळाव्याच्या कामाला लागल्याचं चित्र दिसत आहे. अशातच खरी शिवसेना कोण यासंदर्भात चर्चा सुरु असतानाच पत्रकारांनी कालच्या या बैठकीनंतर दिपक केसरकर यांना शिंदे गटाचा पक्षप्रमुख कोण आणि मुख्य नेते कोण यासंदर्भातील प्रश्न विचारले.

नक्की वाचा >> उद्धव ठाकरे म्हणतात, “शिवसेना सज्ज, येईल त्या परिस्थितीला…”; शिंदेंना लक्ष्य करत म्हणाले, “कमळाबाईंच्या कोठ्यावर दौलतजादा करून…”

पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना केसरकर यांनी, “आमचे मुख्य नेते शिंदेसाहेब आहेत,” असं सांगितलं. तसेच पुढे बोलताना पक्षप्रमुख पदासंदर्भातील अधिक माहिती मुख्यमंत्री शिंदेंनाच असेल असंही विधान केसरकर यांनी केलं. “मुख्यमंत्री शिंदे यांनी जाणीवपूर्वक पक्षप्रमुख पद मोकळं ठेवलं की काय हे तेच सांगू शकतील. पण सध्या शिंदेसाहेबांनी पक्षप्रमुख पदावर कोणाचीही निवड केलेली नाही,” असंही केसरकर यांनी स्पष्ट केलं. यावेळी केसरकर यांनी शिंदे हेच आमचे मुख्य नेते असल्याचंही अधोरेखित केलं. “मुख्य नेते या पदावर महाराष्ट्रातील, भारतातील सर्व लोकांनी शिंदेसाहेबांची निवड केलेली आहे. ते आमचे मुख्य नेते असून संपूर्ण शिवसेना त्यांच्यासोबत आहे,” असंही केसरकर म्हणाले.

दसरा मेळावा हा बाळासाहेबांच्या विचारांचे सोन लुटणारा दिवस असल्याचं नमूद करत केसरकर यांनी महाराष्ट्रात लोकशाही अवतरल्याचं म्हटलं. तसेच मुख्यमंत्री शिंदे हेच शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचं आकर्षण असणार आहेत असंही केसरकरांनी सांगितलं. तसेच पाहुणे म्हणून नेमकं कोणाला बोलवायचं याबद्दल ठोस असा कोणताही निर्णय झाला नसल्याचं त्यांनी नमूद केलं. हिंदुत्वाचा विचार मानणारे पाहुणे असावे. याची काळजी घेतली पाहिजे, इतकेच या बैठकीत ठरल्याचं हे पाहुण्यांसंदर्भात म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shinde vs thackeray fight over real shivsena minister deepak kesarkar talks about party chief post scsg
First published on: 29-09-2022 at 09:08 IST