कापसाला प्रति क्विंटल दहा हजारांचा भाव

बीड : कापसाच्या उत्पादनात घट झाल्यानंतर कापसाला सोन्याचा भाव आला असून सध्या कापसाला प्रति क्विंटल दहा हजाराचा भाव मिळू लागला आहे. मोठय़ा प्रमाणावर मेहनत करून, वेळोवेळी औषध फवारणी, खुरपण करूनही उत्पादन वाढत नसल्याने शेतकऱ्यांनी कापसाऐवजी अन्य पिकांना प्राधान्य दिले. परिणामी उत्पादन घटताच चांगला भाव मिळाला. महिनाभरापूर्वी हाच भाव सात हजार रुपये प्रतिक्विंटल असा होता. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यावर्षी कापसाऐवजी सोयाबीन आणि तुरीच्या पेरणीवर भर दिल्याने कापसाचे क्षेत्र तब्बल एक लाख हेक्टरने घटले.

f you're watching your blood sugar levels, you might want to keep an eye on how much bread you're pairing with your eggs
अंडे ब्रेडबरोबर खावे की ब्रेडशिवाय? रक्तातील साखर वाढू नये म्हणून अंडे कसे खावे? जाणून घ्या अंडी खाण्याचा उत्तम मार्ग
Heat wave again in Vidarbha Akola recorded the highest temperature on Friday
विदर्भात पुन्हा उष्णतेची लाट? जाणून घ्या, अकोल्यात पारा कुठे पोहचला
Intermittent Fasting risks heart attack
सावधान! ‘या’ प्रकारचा उपवास केल्याने येऊ शकतो हृदयविकाराचा झटका? स्वतःची काळजी कशी घ्याल?
12 different products in maharastra received gi tags
तुळजापूरच्या कवड्याच्या माळेसह कोणत्या उत्पादनांना मिळाले जीआय मानांकन? जाणून घ्या सविस्तर…

अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम हातचा गेल्याने शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला होता. दुष्काळ, अतिवृष्टी आणि किडीचा प्रादुर्भाव यामुळे शेतकऱ्यांनी कापूस लागवडीकडे दुर्लक्ष केले.  धारुर येथील नर्मदा जीनिंग अँड प्रेसिंगने ९ हजार ९५० रुपये, तर आडस येथे स्थानिक पातळीवर ९ हजार ९०० रुपये प्रति क्विंटलचा भाव कापसाला मिळाला. काही ठिकाणी मध्यम आणि लांब धाग्याच्या कापसानुसार भाव ठरला जात असला तरी बहुतांश खरेदी केंद्रावर दहा हजार रुपयांपर्यंत भाव मिळू लागला आहे. खर्च अधिक व उत्पन्न कमी अशी अवस्था झालेल्या कापसाला यावर्षी ऐतिहासिक भाव मिळू लागल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.