राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे वादंग निर्माण झालेला आहे. विरोधी पक्षांनी राज्यपालांविरोधात आक्रमक भूमिका घेत, त्यांना हटवण्याची मागणी केलेली आहे. याशिवाय राज्यभरातही विविध ठिकाणी राज्यपालांच्या वक्तव्याच्या विरोधात निदर्शने होत असून, निषेध नोंदवला जात आहे. राज्यपाल कोश्यारी आज अमरावतीमध्ये आहेत, यावेळी शिवसेना(ठाकरे गट) कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले.

यावेळी आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी राज्यपालांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. एवढच नाहीतर चपला दाखवून निषेधही नोंदवली. पोलिसांनी वेळीच या आंदोलकांना ताब्यात घेतले.

nashik pakistan zindabad slogans marathi news
उपनगर पोलीस ठाण्याबाहेर जमावाकडून पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, भाजप आमदार देवयानी फरांदे यांची तक्रार
parbhani lok sabha marathi news, shivsena parbhani lok sabha marathi news, sanjay jadhav parbhani loksabha marathi news
पस्तीस वर्षात ‘धनुष्यबाण’ चिन्हाशिवाय बालेकिल्ल्यातील शिवसेनेची पहिलीच निवडणूक
aap protests on delhi road against arvind kejriwal s arrest
‘आप’ विरुद्ध भाजप; केजरीवाल यांच्या समर्थनार्थ ‘आप’ची निदर्शने, भाजपकडून राजीनाम्याची मागणी
Accused who absconded after killing from Bihar state arrested by Naigaon police vasai
बिहार राज्यातून हत्या करून फरार झालेला आरोपी नायगाव पोलिसांच्या जाळ्यात

हेही वाचा – “तुम्ही स्वार्थासाठी पक्ष सोडून गेलात, उद्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तर…” कैलास गोरंट्याल यांची अर्जुन खोतकरांवर टीका!

महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमाप्रश्नांवर दोन्ही राज्यांच्या राज्यापालांची अमरावतीमध्ये डॉ. पंजाबराव देशमुख प्रशासकीय प्रबोधनीत आज(शनिवार) महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. या बैठकीसाठी राज्यपाल जात असताना हातात चपला घेत त्यांच्या वाहन ताफ्यात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना वेळीच रोखले आणि ताब्यात घेतले.