कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ताकदीने लढण्याचा इरादा व्यक्त करीत गुरुवारी शिवसेनेच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. या वेळी शिवसेनेने शक्तिप्रदर्शन केले. बाजार समितीमध्ये शिवसेनेचा चंचूप्रवेश निश्चित होईल असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. शिवसेनेच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असून त्यामध्ये फक्त पक्षाच्याच कार्यकर्त्यांचा समावेश असून भाजपा व स्वाभिमानीला संधी कितपत मिळणार याची चर्चा आहे.
जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार गेली अनेक वष्रे वादग्रस्त आहे. त्याची दखल घेऊन राज्य शासनाने संस्थेवर प्रशासक नेमला होता. सहकार कायद्यातील सुधारणेनंतर या संस्थेची निवडणूक होत आहे. संस्थेतील भ्रष्टाचार, सत्ताधाऱ्यांची मनमानी हे मुद्दे उपस्थित करुन शिवसेनेने निवडणूक ताकदीने लढवण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपा व स्वाभिमानीलाही सोबत घेतले जाणार असल्याचे सेनेकडून सांगण्यात आले.
गुरुवारी शिवसेनेकडून दाखल करण्यात आलेल्या उमेदवारांमध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांचाही समावेश आहे. गटनिहाय उमेदवार याप्रमाणे – सेवा संस्था सर्वसाधारण  उदय सुतार, सुरेश पोवार, डॉ. अनिल पाटील, सुभाष पाटील, महिला प्रतिनिधी – सुषमा राजन पाटील, पूजा संभाजी खोत, इतर मागासवर्गीय  उदय सुतार, अशोक पाटील, ग्रामपंचायत गट  पोपट दांगट, विलास पाटील, बापू किल्लेदार, अश्विनी विठ्ठल पाटील, संगिता प्रभाकर हातरोटे, अशोक पाटील, उत्तम पाटील, रेश्मा केरबा राजिगरे, अरुणा कुमार दळवी, कृष्णात जासूद, दिलीप यादव. अनुसूचित जमाती  सागर बुचडे, आíथक दुर्बल  मनिषा सरदार निवडेकर.
अर्ज दाखल करतेवेळी जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, हर्षल सुर्वे, तानाजी आंग्रे, बाजीराव पाटील, शुभांगी साळुंखे यांच्यासह शिवसनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.