Bhaskar Jadhav on Tukaram Mundhe FDA Action: तुकाराम मुंढे यांचे नाव आता राज्याच्या घराघरात पोहोचले आहे. मे महिन्यात अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारला. त्यानंतर अवघ्या दोन ते तीन महिन्यात त्यांनी कारवाईचा धडका लावत आपला दरारा निर्माण केला. आपण जे रोज खातो, ते अन्न किती दुषित आहे, याची जाणीव लोकांना नव्याने झाली. त्यामुळे तुकाराम मुंढे यांच्या प्रत्येक कारवाईचे कौतुक होऊ लागले. मात्र ज्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या जीवावर ही कारवाई सुरू आहे, त्यातील काही जण हे तुकाराम मुंढे यांच्या विरोधात गेल्याचे सांगितले जात आहे. ही बाब जाहीर होताच शिवसेनेचे (ठाकरे) नेते भास्कर जाधव यांनी सरकारवर जोरदार टीका केली.
काय म्हणाले भास्कर जाधव?
“तुकाराम मुंढे यांच्या खात्यातील काही अधिकारी जेव्हा त्यांच्या विरोधात उठाव करतात, तेव्हा या अधिकाऱ्यांमागे सरकारमधीलच कुणीतरी व्यक्ती असणार. तुकाराम मुंढे यांचा दबदबा पाहता, त्यांच्या खात्यातीलच अधिकारी त्यांच्या विरोधात बंड करण्याचे धाडस दाखवतील, असे वाटत नाही”, अशी प्रतिक्रिया तुकाराम मुंढे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
भास्कर जाधव पुढे म्हणाले, “तुकाराम मुंढे हे सध्या सरकारसाठी अडचणीचे ठरत आहेत, असेही भास्कर जाधव म्हणाले. सरकारला त्यांचा खूप मोठा त्रास होत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना पुढे करून तुकाराम मुंढेंना त्रास देण्याचे प्रयत्न सरकारकडून सुरू असल्याचे दिसते.”
नेमके प्रकरण काय?
छत्रपती संभाजीनगरमधील अन्न व औषध प्रशासनाच्या प्रयोगशाळेतील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी या विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. प्रयोगशाळेचे सहसंचालक असलेल्या तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीवर २९ कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

कारणे काय?
या पत्रात नमूद केल्याप्रमाणे कर्मचाऱ्यांना दोन शिफ्टमध्ये काम करण्याचे निर्देश, शनिवारी-रविवारी आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी काम करण्याचे आदेश, रिक्त पदांमुळे वाढलेला कामाचा ताण यामुळे कर्मचारी, अधिकारी त्रस्त आहेत, असे सांगितले जाते.
तुकाराम मुंढे यांच्या आजवरच्या कारकिर्दीत त्यांच्याबद्दल अनेक वाद निर्माण झालेले आहेत. २१ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांची अनेकदा बदली झाली आहे. वारंवार बदली होत असली तरी तुकाराम मुंढे यांची काम करण्याची शैली कधीही बदलत नाही. आपले प्रशासकीय कर्तव्य पार पाडत असताना ते प्रसंगी सरकारचीही नाराजी ओढवून घेतात.
तुकाराम मुंढे यांची आतापर्यंतची कारकिर्द
१) ऑगस्ट २००५ – प्रशिक्षणार्थी, उपजिल्हाधिकारी सोलापूर
२)सप्टेंबर २००७ – उप जिल्हाधिकारी, देगलूर उपविभाग
३) जानेवारी २००८ – सीईओ, जिल्हा परिषद नागपूर
४) मार्च २००९ – आयुक्त, आदिवासी विभाग
५) जुलै २००९ – सीईओ, वाशिम
६) जून २०१० – सीईओ, कल्याण<br>७) जून २०११ – जिल्हाधिकारी, जालना<br>८) सप्टेंबर २०१२ – विक्रीकर सहआयुक्त मुंबई
९) नोव्हेंबर २०१४ – सोलापूर जिल्हाधिकारी
१०) मे २०१६ – आयुक्त, नवी मुंबई महापालिका
११) मार्च २०१७ – मुख्य कार्यकारी अधिकारी, पीएमपीएल, पुणे
१२) फेब्रुवारी २०१८ – आयुक्त, नाशिक महापालिका
१३) नोव्हेंबर २०१८ – सहसचिव, नियोजन
१४) डिसेंबर २०१८ -प्रकल्प अधिकारी, एड्स नियंत्रण, मुंबई
१५) जानेवारी २०२० – आयुक्त, नागपूर महापालिका
१६) ऑगस्ट २०२० – सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई
१७) जानेवारी २०२१ – राष्ट्रीय मानवाधिकार आयोग भारत
१८) सप्टेंबर २०२२ – आयुक्त आरोग्य सेवा व संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान
१९) जुलै २०२३ – पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास विभाग
२०) जून २०२४ – विकास आयुक्त (असंघटित कामगार)
२१) ऑगस्ट २०२५: सचिव, दिव्यांग कल्याण आयुक्तालय, मंत्रालय
२२) मे २०२६: आयुक्त, अन्न व औषध प्रशासन
