राज्यात नव्याने स्थापन झालेल्या भाजपा-शिंदे सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला असून या सरकारवर आता खऱ्या अर्थाने शिक्कामोर्तब झालं आहे. आज विधिमंडळाच्या दोन दिवसीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी हा विश्वासदर्शक ठराव भाजपा-शिंदे सरकारने जिंकला आहे. दरम्यान, हे सरकार आज खऱ्या स्थिरावले असले तरी विरोधकांकडून मात्र लकवरच मध्यावधी निवडणुका लगतील असे भाकित वर्तविले जात असून भाजपा आणि शिंदे गटावर कठोर टीका केली जात आहे. आज विधिमंडळ अधिवेशनातही शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शिंदे-भाजपा गटातील नेत्यांना लक्ष्य केलं. शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी तर थेट महाभारत, रामायण आणि पानिपत युद्धाचा दाखला देऊन भाजपावर टीकेचे आसूड ओढले. त्यांनी राज्यात पुन्हा एकदा महाभारत घडणार असं भाकित केलंय.

हेही वाचा >>> राज ठाकरेंच्या पत्रावर फडणवीसांची विधानसभेत प्रतिक्रिया; म्हणाले, “खरंतर मी त्याला दुसऱ्या दिवशी…”

“या महाराष्ट्रात पुन्हा एकदा महाभारत आणि रामायणाची पुनरावृत्ती होणार आहे. सख्खे चुलत भाऊ समोरासमोर उभे राहणार आहेत. पानिपतच्या युद्धात एकमेकांच्या विरोधात दिल्लीच्या बादशहासाठी लढत आहेत. पण दिल्लीचा बादशहा मात्र सहिसलामत आहे. मरताय ते फक्त महाराष्ट्राती मराठी लोक. बादशहा मात्र सुखरुप आहे,” असे भास्कर जाधव भाजपाला उद्देशून म्हणाले.

हेही वाचा >>> “एकनाथ शिंदेंमध्ये पात्रता होती, तर मग तुमच्या टर्ममध्ये त्यांना एकच छोटंस खातं का दिलं होतं?”

तसेच, “सरकार स्थापन झाल्यापासून तुमची प्रत्येक चाल सरकार उलथवून लावण्यासाठी होती. राज्यात करोनासारखं संकट आलं. महाराष्ट्राची एक परंपरा आहे. एक विचारधारा आहे. राज्य संकटात असताना सरकार कोणाचे आहे हे पाहिलं जात नाही; तर संकटात राज्य बाहेर कसे येईल यासाठी सत्ताधारी आणि विरोधक खांद्याला खांदे लावून लढत असतात. मात्र करोनासंकटात तुमची प्रत्येक कृती ही विरोधातील होती,” असा आरोप भास्कर जाधव यांनी केला.

हेही वाचा >>> “देवेंद्र फडणवीस सर्वात नशीबवान आमदार” म्हणत विधानसभेत अजित पवारांची तुफान टोलेबाजी

“सकाळी सकार पडेल, पंधरा दिवसात पडेल, आज पडेल उद्या पडेल असं म्हटलं गेलं. तुम्ही कधी कोणाच्या हातात भोंगा दिला, कधी कोणाच्या हातामध्ये हनुमान चालिसा दिलात. कधी महाराष्ट्रात नुपूर शर्मा आणलीत. कधी महाराष्ट्रात हिजाब आणला. कधी कंगना राणौत आणलीत तर कधी सुशांतसिंह राजपूत महाराष्ट्रात आणला. या महाराष्ट्राची सत्ता उलथवून लावण्याचा प्रयत्न केला. पण सत्ता कायम राहिली,” असे म्हणत त्यांनी भाजपाकडून महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी हर तऱ्हेने प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप केला.

हेही वाचा >>> “…तर माझ्यामागे ईडी लागेल”; ‘अबतक छप्पन’ म्हणत काँग्रेस आमदाराची मतमोजणीतच राजकीय टोलेबाजी

तसेच पुढे बोलताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन करत त्यांच्या जबाबदारीची जाणिव करुन दिली. “मी एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन करतो. मात्र अभिनंदन करता तुमच्या जबाबदारीची जाणीव करुन देतो,” असे भास्कर जाधव म्हणाले.