पिंपरी चिंचवड आणि कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर आता सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. या मतदारसंघात उमेदवार देण्याबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. त्यात पिंपरी चिंचवडची जागा शिवसेनेने लढवावी आणि कसबा मतदारसंघ काँग्रेस-राष्ट्रवादीने लढवावा, अशी आमची भूमिका असल्याचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती पाहता ही पोटनिवडणूक बिनविरोध करावी, अशी मागणी भाजपा आणि मुख्यमंत्र्यांनी मांडली होती. मात्र संजय राऊत यांनी नांदेड आणि पंढरपूर पोटनिवडणुकीचे उदाहरण देत या निवडणुका बिनविरोध होणार नसल्याचे सांगितले.

आज सकाळी माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, “अंधेरीची निवडणूक बिनविरोध झालेली नव्हती. भाजपाकडे उमेदवार नव्हता, म्हणून त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली होती. नांदेड आणि पंढरपूर येथे देखील पोटनिवडणुका बिनविरोध झाल्या नाहीत. दोन्ही ठिकाणी मृत आमदाराचे नातेवाईक उभे असतानाही भाजपाकडून उमेदवार देण्यात आले. पंढरपूर-नांदेडच्या निवडणुकीत संस्कृती दिसली नाही. अंधेरीच्या निवडणुकीत दिसली त्याला वेगळी कारणे आहेत.”

A proposal that Chhagan Bhujbal should contest elections from Nashik from BJP
‘कमळ’वर लढण्याचा भुजबळ यांना प्रस्ताव? ओबीसी मतपेढीसाठी भाजप पक्षश्रेष्ठींची खेळी
Vanchit Bahujan Aghadi Changes Lok Sabha Candidates in maharashtra ahead of lok sabha 2024 Election
‘वंचित’ चा फेरबदल कोणाच्या फायद्याचा? कोणाच्या सांगण्यावरून?
High class houses out of MHADA lottery Thinking of stopping construction of expensive houses from now on
म्हाडा सोडतीतून उच्च गटातील घरे बाद? यापुढे महागड्या घरांची निर्मिती थांबवण्याचा विचार
ram satpute marathi news, praniti shinde marathi news
सोलापूरमध्ये ‘उपऱ्या’वरूनच भाजपच्या सातपूते यांची कोंडी

राष्ट्रवादी दोन्ही जागा लढविण्यासाठी इच्छूक

संजय राऊत यांनी मविआच्या बैठकीनंतर शिवसेनेची भूमिका व्यक्त केली असली तर अद्याप मविआची अधिकृत भूमिका समोर आलेली नाही. कारण राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही जागांसाठी इच्छूक आहे. पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे चांगले प्राबल्य आहे. महानगरपालिकेवर सातत्याने राष्ट्रवादीची सत्ता राहिली होती. लक्ष्मण जगताप देखील अनेक वर्ष राष्ट्रवादी सोबत होते. तर दुसरीकडे पुण्यात देखील राष्ट्रवादीचे संघटन मजबूत आहे. पुणे मनपामध्ये राष्ट्रवादीचे चांगले प्रतिनिधित्व आहे. तसेच पुण्यात काँग्रेसची देखील चांगली ताकद आहे. त्यामुळे या दोन जागा कोणत्या पक्षांना मिळणार याचा निर्णय अद्याप होणे बाकी आहे.

हे ही वाचा >> चिंचवड पोटनिवडणूक: ‘राजा का बेटा राजा नही बनेगा!’ भाजप विरोधात राष्ट्रवादीने दंड थोपटले?

पिंपरी चिंचवड आणि कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या संदर्भात काल (दि. २४ जानेवारी) मविआ नेत्यांची चर्चा झालेली आहे. आज परत एकदा त्यावर चर्चा केली जाईल. पिंपरी चिंचवडची जागा शिवसेनेनी द्यावी, तसेच पुण्यातील कसबा मतदारसंघाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादी निर्णय घ्यावा, अशी भूमिका संजय राऊत यांनी माध्यमांसमोर व्यक्त केली. आम्ही निवडणुकीपासून लांब राहिलो तरी काही अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे मविआने या पोटनिवडणुका लढविण्याचा विचार केला असल्याचेही संजय राऊत म्हणाले.

हे वाचा >> Breaking: निवडणूक आयोगाने चिंचवड, कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या तारखा बदलल्या; परिपत्रकात दिलं ‘हे’ कारण!

पोटनिवडणुकीच्या तारखा बदलल्या

दरम्यान निवडणूक आयोगाने पिंपरी चिंचवड आणि कसबा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकांच्या तारखात बदल करण्यात आला आहे. अरुणाचल प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल, तामिळनाडू येथील निवडणुकीसोबतच २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रात निवडणूक होणार होती. मात्र बारावीच्या परिक्षा असल्यामुळे आता एक दिवस आधी म्हणजेच २६ फेब्रुवारी रोजी आता महाराष्ट्रातील या दोन मतदारसंघात पोटनिवडणूक होईल.