Premium

“केशवराव हे फालतू धंदे बंद करा, असेच खोटे बोलत राहिलात तर…” संजय राऊतांचे केशव उपाध्येंना प्रत्युत्तर!

“महाराष्ट्राचे राजकरण खालच्या थराला नेणारे तुम्ही लोकच आहात.” असेही संजय राऊत म्हणाले आहेत.

Sanjay Raut and Keshav Upadhye
(फोटो-लोकसत्ता ग्राफीक्स टीम)

शिवसेना(ठाकरे गट) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्यावर प्रसारमाध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेवरून भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी टीका केली आहे. त्यावर आता संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नक्की वाचा – “विरोधकांचं ऐक्य वैगेरे या महान शब्दांना महत्त्व देऊन आम्ही त्याग करत आलो, पण यापुढे…” संजय राऊतांचा सूचक इशारा!

“केशवराव हे फालतूचे धंदे बंद करा! रेटून खोटे बोलण्याची तुमची फॅक्टरी जनताच बंद केल्याशिवाय राहणार नाही.संपूर्ण क्लिप दाखवा आणि कॉमेंट करा. महाराष्ट्राचे राजकरण खालच्या थराला नेणारे तुम्ही लोकच आहात. असेच खोटे बोलत राहिलात तर जनता रस्त्यावर उतरून तुमचे थोबाड फोडेल. जय महाराष्ट्र!” असं संजय राऊत म्हणाले आहेत.

केशव उपाध्ये काय म्हणाले आहेत? –

महाराष्ट्राच राजकारण कोणत्या थराला नेत आहात संजय राऊत? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याबद्दल ही भाषा? एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्राचा अपमान आपण करत आहात. मतभेद असू शकतात पण ही भाषा? संजय राऊत माफी मागा महाराष्ट्राची. असं भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये ट्वीटद्वारे म्हणाले आहेत.

या ट्वीटसोबत केशव उपाध्ये यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामध्ये संजय राऊत प्रसारमाध्यमांशी बोलत आहेत. मुख्यमंत्री दावोसला गेले आहेत, या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना संजय राऊतांना मुख्यमंत्र्यांना उद्देशून आक्षेपार्ह शब्द वापरल्याचे दिसून येते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shiv sena leader sanjay raut criticized bjp spokesperson keshav upadhyay msr

Next Story
“मला स्वत:चं घर नाही, मी वडिलांच्या…”, ३०-३० घोटाळ्यावर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया