तीन वेळा आमदार व राज्यमंत्री राहिलेल्या शिवसेना नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश; नाना पटोलेंनी केलं स्वागत

शिवसेनेतील काही अंतर्गत मुद्द्यांवरून मागील काही दिवसांपासून नाराज होते, असे देखील बोलले जात आहे.

अशोक शिंदे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस नेते भाई जगताप व अन्य काँग्रेस नेत्यांची उपस्थिती होती.

शिवसेनेचे उपनेते, तीन वेळा आमदार आणि माजी राज्यमंत्री असलेल्या अशोक शिंदे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. शिवसेनेला सोडचिठ्ठी देत त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थित आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

शिवसेनेचे नेते व माजी राज्यमंत्री असलेले अशोक शिंदे हे वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. तीन वेळा ते आमदार होते. तर, मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना अशोक शिंदे यांना राज्यमंत्रीपद देखील देण्यात आलं होतं. तीन वेळा आमदार राहिलेल्या अशोक शिंदे यांचा २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा उमेदवाराकडून पराभव झाला होता.

मागील काही दिवसांपासून ते शिवसेनेतील अंतर्गत वादामुळे व वरिष्ठ नेतेमंडळींकडून योग्य ती दखल घेतली जात नसल्याने, नाराज होते असे सांगितले जात आहे. यामुळेच त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत आज अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचं बोललं जात आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Shiv sena leader three time mla and former minister ashok shinde joined congress today msr

ताज्या बातम्या