नवं सरकार शंभर तासही चालणार नाही असे दावे जे ‘ऐंशी तास’वाले करीत होते, त्यांना तसेच बोंबलत ठेवून सरकारने शंभर दिवसांत बरेच काही करून आणि घडवून दाखवले. जनतेच्या मनात जी अविश्वासाची किरणे होती त्यांचे रूपांतर विश्वासाच्या किरणांत करण्याची किमया ‘ठाकरे सरकार’ने शंभर दिवसांत केली, असे म्हणत शिवसेनेने अप्रत्यक्षरित्या भाजपावर निशाणा साधला आहे.

काही सरकारे फक्त दिवस ढकलतात किंवा मोजत बसतात. पंधरा दिवसांचा टप्पा पार केला तरी जाहिरातरूपाने उत्सव साजरा करतात. अशा जाहिरातबाज राजकारण्यांचे मुखवटे गेल्या शंभर दिवसांत महाराष्ट्रात फाटलेच आहेत. त्या मुखवटेबाजांची होळी झाली आहे, असे म्हणत शिवसेनेने भाजपावर टीकेचे बाण सोडले आहेत. शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून भाजपावर निशाणा साधला आहे.

काय म्हटलंय अग्रलेखात ?
महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेने रामराज्य सुरू झाले त्यास शंभर दिवस झाले. हे सरकार शंभर तासही चालणार नाही असे दावे जे ‘ऐंशी तास’वाले करीत होते, त्यांना तसेच बोंबलत ठेवून सरकारने शंभर दिवसांत बरेच काही करून आणि घडवून दाखवले. जनतेच्या मनात जी अविश्वासाची किरणे होती त्यांचे रूपांतर विश्वासाच्या किरणांत करण्याची किमया ‘ठाकरे सरकार’ने शंभर दिवसांत केली.

काही सरकारे फक्त दिवस ढकलतात किंवा मोजत बसतात. पंधरा दिवसांचा टप्पा पार केला तरी जाहिरातरूपाने उत्सव साजरा करतात. अशा जाहिरातबाज राजकारण्यांचे मुखवटे गेल्या शंभर दिवसांत महाराष्ट्रात फाटलेच आहेत. सरकार कोणाच्याही पाठिंब्याने चालत असले तरी उद्धव ठाकरे शिवसेना आतून-बाहेरून जशी होती तशीच आहे. विचार आणि भूमिकेत कोणतेही बदल झाले नाहीत.