केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणावरुन शिवसेना आणि भाजपाकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. असं असतानाच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल दसरा मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मंगळवारी राणेंना अटक झाल्यानंतर सोशल नेटवर्किंगवर उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यामध्ये केलेल्या वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. मात्र आता या व्हिडीओवरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

नक्की वाचा >> “एखाद्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कानखाली मारेन असं म्हटलं तर..”; संजय राऊत संतापले

सध्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये मुख्यमंत्र्यांनी दसरा मेळाव्याच्या भाषणामध्ये योगी असताना आदित्यनाथ मुख्यमंत्री कसे झाले त्यांनी एखाद्या गुहेमध्ये जाऊन ध्यान साधना करायला हवी. तसेच योगी यांना चप्पलांनी मारण्याची भाषा या व्हिडीओत केल्याचा आरोप केला जात आहे. याचसंदर्भात नाशिकमध्ये भाजपाच्यावतीने सुनील रघुनाथ केदार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात तक्रार दाखल केलीय. योगी यांना चप्पलांनी मारण्याची भाषा या व्हिडीओत केल्याचं तक्रारीमध्ये म्हटलं आहे. तसेच योगी हे केवळ भाजपाचे नेते किंवा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री नसून गोरखपूर मठाचे महंत असल्याने असं वक्तव्य करुन मुख्यमंत्र्यांनी हिंदूंच्या भावना दुखावल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. याच व्हायरल व्हिडीओसंदर्भात आता राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

नक्की वाचा >> रश्मी ठाकरेंविरोधात भाजपाची पोलिसांत तक्रार; गुन्हा दाखल करण्याची मागणी

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार राऊत यांनी या वक्तव्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांची पाठराखण केलीय. “मुख्यमंत्र्यांनी ते वक्तव्य छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केल्याप्रकरणी केलं होतं. महाराष्ट्रामध्ये चप्पल घालून कोणीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालत नाही. ही आमची संस्कृती आणि परंपरा आहे,” असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी योगी आदित्यनाथ यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन स्पष्टीकरण दिलं आहे.

नक्की वाचा >> “फडणवीस व त्यांच्या पक्षाने गांजाच्या शेतात बागडायचे ठरवलेच असेल तर…”; शिवसेनेनं साधला निशाणा

यवतमाळ जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांविरोधात केलेल्या वक्त्याव्याप्रकरणी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून तक्रार दाखल करण्यात आल्या आहेत. भुतडा यांनी लोकसत्ताच्या प्रतिनिधिंशी बोलताना ही माहिती दिलीय. उमरखेड, यवतमाळ, उसदसहीत एकूण पाच ठिकाणी तक्रारी दाखल करण्यात आल्याचं भुतडा यांनी सांगितलं.