Hemant Godse On Chhagan Bhujbal : राज्यात विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Elections 2024) रणधुमाळी सुरु आहे. विधानसभेच्या निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे, तर २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे देशाचं लक्ष लागलेलं आहे. या निवडणुकीसाठी आता सर्वच पक्षांच्या नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. राज्यभरात ठिकठिकाणी सभा आणि मेळावे पार पडत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. या सभाच्या माध्यमातून महाविकास आघाडीचे नेते महायुतीच्या नेत्यांवर आणि महायुतीचे नेते महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आरोप-प्रत्यारोप करत असल्याचंही पाहायला मिळत आहे. मात्र, असं असतानाच महायुतीमध्ये धुसफूस सुरु झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

शिवसेना शिंदे गटाचे नाशिकचे माजी खासदार हेमंत गोडसे यांनी एका सभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे नाशिकमध्ये महायुतीच्या नेत्यांमध्ये ऐन विधानसभेची निवडणूक सुरु असतानाच खटके उडत असल्याचं पाहायला मिळत आहे. ‘लोकसभेच्या निवडणुकीवेळी त्यांनी (छगन भुजबळ) हातावर लिहिलं की ३ ‘वाजे’ला मतदान करा, पण आपला शिवसैनिक समोरून बोलणारा आहे. पाठीत खंजीर खुपसणारा नाही’, असं म्हणत हेमंत गोडसे यांनी छगन भुजबळ यांच्यावर लोकसभेच्या निवडणुकीत पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप केला आहे.

Sada Sarvankar
Sada Sarvankar : “मला निवडणूक लढवावीच लागेल”, सदा सरवणकर हतबल; म्हणाले, “राज ठाकरेंनी माझी…”
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…
maharashtra assembly election 2024
काँग्रेस अखेर शंभरीपार, अर्जमाघारीनंतर सर्वच पक्षांची अंतिम आकडेवारी आली समोर; वाचा काय आहे नेमकं समीकरण!
Bhau Kadam AJit Pawar
Bhau Kadam : भाऊ कदम निवडणुकीच्या प्रचारात, ‘या’ पक्षासाठी बनला स्टार प्रचारक; पक्ष प्रवेशाबद्दल म्हणाला…
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
sharad pawar retirement (1)
Video: शरद पवारांचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत, आता राज्यसभेतही जाणार नाही? भाषणात म्हणाले…
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

हेही वाचा : सुरतमध्ये महाराजांचं मंदिर, मुलांना मोफत शिक्षण अन् जीवनावश्यक वस्तूंचे स्थिर दर; राधानगरीच्या सभेत ठाकरेंनी कोणी वचने दिली?

हेमंत गोडसे काय म्हणाले?

“लोकसभेच्या निवडणुकीत आपण पाहिलं की, त्यांनी (छगन भुजबळ) आपल्या बरोबर राहिले आणि काय केलं? हातावर लिहिलं ३ ‘वाजे’ला मतदान करा. म्हणजे मला असं वाटतं की आपला शिवसैनिक समोरून बोलणारा आहे. पण पाठीत खंजीर खुपसणारा नाही. त्यामुळे यासंदर्भात आपल्या जिल्ह्यातच नाही तर राज्यात अडचणी निर्माण झाल्या. भुजबळ परिवाराने जिल्ह्यात अडचणी केल्याच, पण त्यांच्या त्या एका मतदारसंघामुळे १५ मतदारसंघात अनेक बंडखोर तयार झाले आहेत”, असा हल्लाबोल हेमंत गोडसे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर केला.

दरम्यान, नाशिक लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते, मंत्री छगन भुजबळ हे इच्छुक होते. पण त्यानंतर छगन भुजबळ यांनी निवडणुकीतून माघार घेतली होती. त्यानंतर नाशिकची उमेदवारी थेट शेवटच्या क्षणी हेमंत गोडसे यांना जाहीर करण्यात आली होती. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे हे निवडणुकीच्या मैदानात होते. अखेर राजाभाऊ वाजे यांनी हेमंत गोडसे यांचा पराभव केला. मात्र, त्या निवडणुकीत छगन भुजबळ यांनी हातावर लिहिलं की, ३’वाजे’ ला मतदान करा आणि पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं, असा आरोप आता हेमंत गोडसे यांनी छगन भुजबळ यांच्यावर केला आहे. त्यामुळे ऐन विधानसभेच्या निवडणुकीत नाशिकमध्ये महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे.

Story img Loader