Nilesh Rane : राज्यात सध्या विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणुकीचा प्रचार जोरात सुरु आहे. राज्यभरात विविध मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीसह इतर पक्षांच्या नेत्यांच्याही सभा सुरु आहेत. सभा, रॅली आणि मेळाव्याच्या माध्यमातून प्रचाराचा धडाका सध्या पाहायाला मिळत आहेत. दरम्यान, या विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी मुख्य लढत होणार आहे. या निवडणुकीकडे देशाचं लक्ष लागलेलं आहे. सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरु आहे.

यातच शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा कुडाळ मालवण मतदारसंघाचे उमेदवार निलेश राणे यांनी केलेल्या एका विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. ‘माझ्यानंतर आलेले आमदार आणि मंत्री झाले. मग मी अजून किती दाढी पिकवायची?’, असं म्हणत निलेश राणे यांनी एका सभेत बोलताना आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे. त्यांच्या या विधानानंतर अनेक चर्चा रंगल्या आहेत.

NCP Clock
NCP Clock Symbol : ऐन निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवारांना आदेश; पक्षचिन्हाबाबत दिला ३६ तासांचा अल्टिमेटम!
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
What Devendra Fadnavis Said?
Devendra Fadnavis : “शरद पवारांनी दिलेला मंत्र आता…”, देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य चर्चेत
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: दुसऱ्या टर्मसाठी डोनाल्ड ट्रम्प यांचा अजेंडा ठरला; पहिल्याच भाषणात केला उल्लेख, म्हणाले…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
BJP Candidate List for Maharashtra Vidhan Sabha Election 2024
BJP Candidate List : भाजपाकडून १४८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर!
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…

हेही वाचा : Devendra Fadnavis : “शरद पवारांनी दिलेला मंत्र आता…”, देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य चर्चेत

निलेश राणे काय म्हणाले?

“मी ठरवलं आहे की असं काहीतरी बनायचं की समोरच्याला वाटलं पाहिजे की, तो माझा माणूस आहे. जो माणूस एकटा उभा असतो. त्या माणसाकडे कुठेतरी दूर्लक्ष केलं जातं. तो माझा माणूस. त्यामुळे मी त्यांच्यासाठी लढत राहिलो. आता १० वर्ष गेली आहेत. अजून किती दाढी पिकवायची? माझ्या नंतरचे बगतो तर नंतरचे मंत्री झाले. माझी काय तशी इच्छा नाही. पण ज्योतिरादित्य शिंदे, सचिन पायलट, अमित देशमुख, विश्वजीत कदम हे माझ्यानंतर आमदार झाले, मंत्री झाले. माझी काय एवढी मोठी स्वप्न नाहीत. मला फक्त कुडाळ मालवण मतदारसंघाच्या जनतेची सेवा संधी करण्याची संधी देवाने द्यावी, एवढंच नाझ्यासाठी भरपूर आहे”, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.

निलेश राणे पुढे म्हणाले, “तुम्ही अडीच वर्ष मला सांभाळलं. खरोखर मी जनतेचे आभार व्यक्त करतो. प्रत्येकाला आपण काहीना काही देण्याचा प्रयत्न केला. आतापर्यंत जशी साथ दिली तशी साथ यापुढेही देतान, अशी अपेक्षा आहे”, असं म्हणत निलेश राणे यांनी मालवण मतदारसंघात झालेल्या एका सभेत बोलताना आमदार आणि मंत्री होण्याची इच्छा बोलून दाखवली आहे.

Story img Loader