लोकसभा निवडणुकीच्या निकालाला दोन आठवडे झाले आहेत. मात्र, अद्यापही ठाकरे गटाचे अमोल किर्तीकर विरुद्ध शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांच्यामधील निकालाचा मुद्दा चर्चेत आहे. शिवसेना शिंदे गटाचे मुंबई उत्तर पश्चिम मध्य लोकसभेचे उमेदवार रवींद्र वायकर यांचा विजय सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. रवींद्र वायकर यांनी अमोल किर्तीकर यांचा अवघ्या ४८ मतांनी पराभव केला. मात्र, यानंतर ठाकरे गटाकडून या मतमोजणीत गैरप्रकार झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.

तसेच रवींद्र वायकर यांच्या मेहुण्याविरोधात मतमोजणी केंद्रामध्ये मोबाईल नेल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात ठाकरे गटाच्या तक्रारीवरून गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. या सर्व प्रकरणावर आता रवींद्र वायकर यांनी प्रतिक्रिया देत शिवसेना ठाकरे गटावर पलटवार केला. “पराभव जिव्हारी लागल्यामुळे हा रडीचा डाव सुरू आहे”, अला हल्लाबोल वायकरांनी ठाकरे गटावर केला.

Ravikant Tupkar
‘स्वाभिमानी’तून हकालपट्टीच्या कारवाईनंतर रविकांत तुपकरांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “माझा काय गुन्हा, मला…”
rajasthan bhilwara murder case
विवाहित महिलेबरोबर प्रेमसंबंध असल्याचा संशय, तरुणाचे अपहरण करून हत्या अन् मृतदेह…; अंगावर शहारे आणणारी घटना समोर!
Narendra Modi In Radhika- Anant Ambani Wedding
नरेंद्र मोदी यांनी नीता अंबानींना वाकून केला नमस्कार? फोटो पाहून लोक म्हणतात, “मालकिणीसमोर तर..”, वाचा खरं काय
delhi hc reserves order on cm arvind kejriwal s bail plea in cbi case
अटकेविरोधातील निर्णय राखीव;अरविंद केजरीवाल यांच्या जामीन अर्जावर २९ जुलैला सुनावणी
cm eknath shinde
भारतीय संघाला दिलेल्या ११ कोटी रुपयांच्या बक्षिसावरून विरोधकांची टीका; CM शिंदेंनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले, “कसाबला…”
worli hit and run case
Worli Hit and Run Case : प्रदीप नाखवांचा हा आक्रोश पाहून तुमचंही मन हेलावून जाईल! म्हणाले, “मी बोनेटवर हात मारला, पण…”
supriya shrinate replied to jagdeep dhankhar
“मर्यादा विरोधकांनी नाही, तर मोदींनी सोडली”, जगदीप धनखड यांच्या ‘त्या’ विधानाला सुप्रिया श्रीनेत यांचे प्रत्युत्तर!
Kalyan Murder Over Alcohol
पार्टीत दारू कमी पडली आणि २५ वर्षीय बर्थडे बॉयला मित्रांनीच संपवलं; २७ जूनच्या रात्री घडलं काय? पोलीस म्हणाले..

हेही वाचा : आदित्य ठाकरेंचं एनडीए सरकारबाबत मोठं विधान; म्हणाले, “काही महिन्यात दिल्लीत…”

रवींद्र वायकर काय म्हणाले?

“एक हजार पोलीस, २० उमेदवारांचे प्रतिनिधी आणि २० च्या २० उमेदवार मतमोजणी केंद्रामध्ये होते. मग रवींद्र वायकर आतमध्ये जाऊन काहीतरी वेगळं कसं करू शकतो? हे कसं शक्य आहे हे मला कळत नाही. हे काय चाललंय? फक्त रडीचा डाव चालला आहे. हा पराभव त्यांच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळे त्यांचं ट्विट आणि हे सर्व सुरु आहे. या रडीच्या डावाला मी महत्व देत नाही. त्यांना जे काय करायचं ते करूद्या. निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीने ही निवडणूक घेतली. ती योग्य पद्धतीने घेतलेली आहे. कोणी कोणाचा नातेवाईक आहे, म्हणून त्याने ते ईव्हीएम हॅक केलं, असं ईव्हीएम मशीन हॅक करता येत का? हे जे काय चाललं आहे, हा रडीचा डाव आहे. त्यामुळे मला यावर उत्तर द्यावसं वाटत नाही, तरीही मी यावर स्पष्टीकरण दिलं आहे”, असं रवींद्र वायकर यांनी म्हटलं आहे.

आदित्य ठाकरे काय म्हणाले?

मुंबई उत्तर पश्चिम मध्य लोकसभेच्या निवडणुकीबाबत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, “मुंबई उत्तर पश्चिम मध्य लोकसभा निवडणुकीतील काहीतरी गोंधळ झाला आहे. येथील सीसीटीव्ही फुटेज निवडणूक आयोगाकडे मागितली होती. मात्र, निवडणूक आयोगाने ते द्यायला नकार दिला आहे. त्यामुळे अशा उमेदवारांना जर पदाची शपथ दिली तर लोकशाहीचा खून झाला आहे, असं समजून काम करावं लागेल, अशा लोकांना शपथ कशी देऊ शकता?”, असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी केला.