Yawal Nagar Parishad Election Result 2025 : भाजपाचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन यांच्या जिल्ह्यातच भाजपाला पराभवाचा धक्का बसला आहे. जळगाव जिल्ह्यातील यावल नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाने दणदणीत विजय मिळवला आहे. ठाकरे गटाच्या उमेदवार छाया पाटील नगराध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे. त्यांनी भाजपाच्या उमेदवार रोहिणी फेगडे यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला आहे. या विजयासह भाजपाने जळगाव जिल्ह्यात नगराध्यक्षपदाचे खाते उघडले आहे.
जळगाव जिल्ह्यातील यावल, पाचोरा, फैजपूर, सावदा, भुसावळ, चोपडा, अंमळनेर, चाळीसगाव, धरणगाव आणि पारोळा या १२ नगरपरिषदांचे निकाल जाहीर आज जाहीर झाले. त्यापैकी बहुतांश नगरपरिषदांमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गटाचा दरारा पाहायला मिळाला. परंतु यावल नगरपरिषद निवडणुकीचा निकाल भाजपाला धक्का देणारा ठरला. भाजपाने या निवडणुकीत रोहिणी फेगडे यांना नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले होते. तर ठाकरे गटाने एकनिष्ठ असलेल्या छाया पाटील यांनी उमेदवारी दिली.
आणखी वाचा : भाजपा शिंदे-पवारांना लवकरच बाहेरचा रस्ता दाखवणार; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा दावा, नेमकं काय म्हणाले?
ठाकरे गटाकडून भाजपाला धक्का
रविवारी सकाळी १० वाजता मतमोजणी सुरू झाल्यापासून भाजपा आणि ठाकरे गटात चुरशीची लढत पाहायला मिळत होती. परंतु अटीतटीच्या लढाईत ठाकरे गटाच्या उमेदवार छाया पाटील यांनी बाजी मारली आहे. भाजपाच्या उमेदवार रोहिणी फेगडे यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. यावल तालुक्यात शिवसेना ठाकरे गटाकडून भाजपाला बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे. यावल नगरपरिषद निवडणुकीत एकूण २० प्रभाग आहेत. २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत एकसंध शिवसेनेच्या उमेदवार सुरेखा कोळी यांनी विजय मिळवला होता. यंदा ही नगरपरिषद आपल्या ताब्यात घेण्यासाठी भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी पूर्ण ताकद लावली होती. मात्र, अटीतटीच्या लढतीत नगरपरिषदेत ठाकरे गटाने बाजी मारली आहे.
हेही वाचा : भाजपाचे सर्व उमेदवार पराभूत; पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, धारूरमध्ये काय घडलं?
चोपडा निवडणुकीत कुणाचा विजय?
चोपडा तालुक्यातील नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना शिंदे गट आणि काँग्रेसमध्ये युती झाली होती. दोन्ही पक्षांनी नगराध्यक्षपदासाठी नम्रता पाटील यांना उमेदवारी दिली होती. यावेळी झालेल्या चुरशीच्या लढतीत पाटील यांनी भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार साधना चौधरी यांचा पराभव केला आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांनी हा गड राखला आहे. चोपडा नगरपरिषद निवडणुकीत एकूण ३१ प्रभाग आहे. त्यापैकी शिवसेना शिंदे गटाने १६, भाजपाने सहा, काँग्रेसने चार, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने दोन प्रभागांमध्ये विजय मिळवला आहे. इतर दोन प्रभागांमध्ये अपक्ष उमेदवारांनी बाजी मारली आहे. या निवडणुकीच्या निकालाची सध्या जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे… या बातमीसाठी हेडिंग यूआरएल आणि कीवर्ड हवे आहे.
