Sanjay Raut On BMC Election 2025 : विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला आलेल्या अपयशानंतर आता महाविकास आघाडीत खटके उडायला सुरुवात झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून आघाडीतील तिनही पक्षांचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. यातच पुढील काही महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आतापासून सुरुवात केली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाची महत्वाची बैठक उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी घेतली होती. या बैठकीत कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या.

तसेच महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचे संकेत काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी दिले होते. त्यानंतर आज (११ जानेवारी) खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना मोठी घोषणा केली आहे. “मुंबईपासून ते नागपूरपर्यंत सर्व महापालिकेच्या निवडणुका आम्ही स्वबळावर लढवणार आहोत”, अशी घोषणाच संजय राऊत यांनी केली. त्यांच्या या घोषणेमुळे महाविकास आघाडीतील नेत्यांकडून आता प्रतिक्रिया येत आहेत. तसेच ठाकरे गटाच्या या घोषणेमुळे महाविकास आघाडीत फूट पडली आहे का? याबाबत आता चर्चा रंगल्या आहेत.

uddhav Thackeray Devendra fadnavis
“पुढील मकर संक्रांतीपर्यंत ठाकरे-फडणवीस एकत्र”, आमदार रवी राणांचा दावा
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Chandrakant Khaire
Chandrakant Khaire : “हात जोडून विनंती करतो, उद्धव ठाकरेंची साथ सोडू नका”, चंद्रकांत खैरेंचं व्यासपीठावर कार्यकर्त्यांना दंडवत
Vijay Wadettiwar On Thackeray group
Vijay Wadettiwar : “आम्ही उद्धव ठाकरेंना विनंती करू, अन्यथा…”, ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेवर विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान
Amit Deshmukh On BMC Election 2025
Amit Deshmukh : ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेनंतर काँग्रेसची भूमिका काय? अमित देशमुखांचं मोठं भाष्य; म्हणाले, “आम्ही देखील…”
Why Dispute in MVA?
Mahavikas Aghadi : महाविकास आघाडीत वादाच्या ठिणग्या का पडत आहेत? महापालिका निवडणुकांच्या आधीच उभा दावा ?
Sanjay Shirsat On Mahavikas Aghadi
Sanjay Shirsat : महाविकास आघाडी तुटणार? संजय शिरसाटांचा मोठा दावा; म्हणाले, ‘शरद पवारांचा गट लवकरच सत्तेत…’
Mumbai Highcourt
Mumbai Highcourt : ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का; मुंबई उच्च न्यायालयाने ‘ती’ याचिका फेटाळली

हेही वाचा : Pratap Sarnaik : उद्धव ठाकरेंना मुंबईत धक्का बसणार? शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “ठाकरे गटाचे…”

महापालिकेच्या निवडणुकीबाबत राऊतांनी काय घोषणा केली?

“मुंबईसह नागपूरपर्यंत आम्ही महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढवणार आहोत. मग काय होईल ते होईल? एकदा आम्हाला आमची ताकद आजमावायचीच आहे. आम्ही महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढणार आहोत. नागपूरला सुद्धा आम्ही स्वबळावर लढणार आहोत. आम्हाला उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भातील संकेत दिलेले आहेत. आमचा असा निर्णय होत आहे की मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर असेल. कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार? कारण आघाडीत आणि विधानसभेत कार्यकर्त्यांना निवडणूक लढण्याची संधी मिळत नाही. त्याचा फटका पक्षाला आणि पक्षाच्या वाढीला बसतो. महानगरपालिका, जिल्हा परिषदा आणि नगरपंचायतीमध्ये निवडणुका स्वबळावर लढून आपआपले पक्ष मजबूत करावे लागतात”, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

भाजपाने शत्रुत्व ठेऊन राजकारणाची परंपरा सुरु केली : संजय राऊत

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत बोलताना उद्धव ठाकरे हे माझे शत्रू नाहीत असं विधान केलं होतं. त्या संदर्भात संजय राऊत यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रश्न विचारला असता राऊत म्हणाले, “त्यांचं खरं आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात एक संस्कृती राहिलेली आहे आणि ती संस्कृती आम्ही देखील पाळलेली आहे. शेवटी राज्याचा विकास आणि जनतेचा विकास महत्वाचा असतो. पण व्यक्तिगत शत्रुत्व ठेवलं नाही पाहिजे. मात्र, दुर्देवाने भारतीय जनता पक्षाने शत्रुत्व ठेऊन राजकारण करण्याची परंपरा सुरु केली”, अशी टीकाही यावेळी संजय राऊत यांनी केली.

Story img Loader