छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर असलेला पुतळा ( Shivaji Maharaj Statue ) कोसळला. २६ ऑगस्टला ही घटना घडली. ज्यानंतर सरकारवर आरोप केले जात आहेत. पुतळा आठ महिन्यांमध्ये कोसळतोच कसा असा प्रश्न महाविकास आघाडीकडून विचारला जातो आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी यावरुन कुणीही राजकारण करु नये असं आवाहन केलं आहे. दरम्यान हा पुतळा ( Shivaji Maharaj Statue ) कोसळला तेव्हा नेमकं काय घडलं? हे मच्छिमार सुनील खंदारे यांनी सांगितलं आहे.

डिसेंबर २०२३ मध्ये उभारण्यात आला पुतळा

डिसेंबर २०२३ मध्ये नौदलाने छत्रपती शिवरायांचा सन्मान म्हणून हा पुतळा उभारला होता. या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. या पुतळ्याच्या अनावरणाच्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यानंतर अवघ्या आठ महिन्यांत पुतळा ( Shivaji Maharaj Statue ) कोसळला आहे. त्यामुळे सरकारवर मोठ्या प्रमाणावर टीका केली जाते आहे. दरम्यान सुनील खंदारे यांनी पुतळा ( Shivaji Maharaj Statue ) कोसळला तेव्हा काय घडलं ते सांगितलं आहे.

Five youths attempted self immolation in Abdul Sattar office Chhatrapati Sambhajinagar news
छत्रपती संभाजीनगर: मंत्री सत्तारांच्या कार्यालयात पाच तरुणांचा आत्मदहनाचा प्रयत्न
Shantanu Naidu ratan tata youngest friend
कोण आहे ३० वर्षांचा पुणेकर शांतनू नायडू? त्याची…
Raj Thackeray told this thing About Ratan Tata
Ratan Tata : “..त्यावेळी रतन टाटांनी खुर्चीतल्या मृतदेहाशी संवाद साधला आणि..”, राज ठाकरेंनी सांगितला होता भन्नाट किस्सा
pratapgad mashal Mahotsav
किल्ले प्रतापगडावर मशाल महोत्सव; राज्यभरातील शिवभक्तांची उपस्थिती
statue of Chhatrapati Shivaji Maharaj, statue Shivaji Maharaj in Rajkot,
राजकोट येथील छत्रपतींच्या नव्या पुतळ्याची जबाबदारी सुतारांकडे – दीपक केसरकर
Malvan, Badlapur, statue of Shivraji Maharaj,
शिवरायांच्या पुतळ्याबाबत बदलापुरात मालवणची पुनरावृत्ती ?
Bhaskar Jadhav Shivaji maharaj
भ्रष्ट लोकांच्या हातून पुन्हा शिवरायांच्या पुतळ्याची उभारणी नको – भास्कर जाधव
arbaz patel apologized about shivaji maharaj issue
शिवाजी महाराजांचा अरबाज पटेलने का नाही केला जयजयकार? बिग बॉस एग्झिटनंतर त्यानेच सांगितलं काय झालं?

काय म्हणाले सुनील खंदारे?

आम्ही पाहिलं दुपारी १ वाजून १८ मिनिटांनी वारा आणि पाऊस आला तेव्हा पुतळा ( Shivaji Maharaj Statue ) कोसळला. आम्ही पुतळा कोसळताना पाहिला. घरी जाऊन फुले म्हणून साहेब आहेत त्यांना मी फोन केला. त्यांना सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. त्यानंतर ते लगेच घटनास्थळी पोहचले, आम्हीही पोहचले. पुतळ्याची अवस्था पाहून खूप वेदना झाल्या. आम्ही पुतळ्याची ती अवस्था बघितल्यानंतर ताडपत्र्या टाकल्या आणि पुतळा झाकला. त्यानंतर कुडाळवरुनही अधिकारी आले. पुतळा कोसळताना आम्ही डोळ्यांनी पाहिलं असं मच्छिमार सुनील खंदारे यांनी एबीपी माझाला सांगितलं.

हे पण वाचा- Chhatrapati Shivaji Statue : छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यात शिल्पकार जयदीप आपटेने कापूस आणि कापड..”, नाना पटोलेंचा गंभीर आरोप

आम्हाला वाटलं आमच्या घरातला सदस्यच गेला

सुनील खंदारे पुढे म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांचा तो पुतळा ( Shivaji Maharaj Statue ) कोसळला तेव्हा आम्हाला वाटलं आमच्या घरातला सदस्य नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते. पर्यटन वाढलं होतं, राजकोटमध्ये परिवर्तन झालं होतं. छोटं गाव होतं तरीही जगात प्रसिद्ध झालं, जी घटना घडली त्यामुळे वाईट वाटलं. खरंतर या ठिकाणी हवा खारी आहे, त्यामुळे कुठलंही लोखंड असलं जे दोन वर्षात गंजतं ते इथे तीन महिन्यात गंजणार. इतका मोठा पुतळा उभारला पण जो सपोर्ट दिला होता तो लोखंडी होता. इलेक्ट्रिक पोलला वापरतात तसं मटेरिअल वापरलं गेलं. ते सहा महिन्यांत गंजलं. नवा पुतळा बसवण्यात येणार असेल तरीही चौथऱ्यावर त्या पुतळ्याचं वजन नीट बसेल ना? याचा अभ्यास करुनच नवा पुतळा बसवला पाहिजे. घाईत जर पुतळा बसवला तर पुन्हा अशी घटना घडू शकते.” असंही सुनील खंदारे यांनी म्हटलं आहे.

बोटींच्या ताडपत्रींनी पुतळा झाकला

पुतळा जर सहा टनाचा होता तर चौथरा ५०० किलोंचाही नव्हता. मी पुतळ्याचे तुकडे पाहिल्यानंतर मी माझ्या बोटींच्या ताडपत्री काढल्या आणि त्यांनी पुतळा झाकला. आता नवा पुतळा उभारणार असतील तर त्यासाठी कुठला कच्चा माल आवश्यक आहे? त्याचा अभ्यास तज्ज्ञांनी करावा. तसंच ज्या प्रकारात पुतळा बांधला जाईल तो इथल्या हवेला टिकेल का? याचाही अभ्यास केला गेला पाहिजे असंही खंदारे यांनी म्हटलं आहे.