ऐतिहासिक शिवाजी पार्कवरचा दसरा मेळावा यंदा कोण घेणार यावरून वाद निर्माण झाला. आता या वादावर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेच्या ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली. तसेच मुंबई महानगरपालिकेने आपल्या अधिकारांचा गैरवापर केल्याचंही महत्त्वाचं निरिक्षण नोंदवलं. दुसरीकडे शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी ठाकरे गटाच्या याचिकेविरोधात हस्तक्षेप याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने ही याचिका देखील फेटाळली आहे. न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.

विश्लेषण: दसरा मेळाव्याची मुहूर्तमेढ केव्हा रचली? पहिल्या मेळाव्यात बाळासाहेबांना होती ‘ही’ भीती

What Bacchu Kadu Said?
अमरावतीतल्या मैदान राड्यानंतर बच्चू कडूंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “मला अटक व्हावी म्हणून राणा दाम्पत्याने…”
Patanjali
“जाहिरातींच्या आकाराएवढा माफीनामा छापला का?” रामदेव बाबांना SC ने फटकारले; न्यायमूर्ती म्हणाल्या “मायक्रोस्कोप घेऊन…”
Ramdev Baba
“आम्ही जाहीर माफी मागण्यासाठी तयार”, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर रामदेव बाबांची प्रतिक्रिया
D Y Chandrachud News in Marathi
सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी उच्च न्यायालयांच्या ‘या’ कृतीवर व्यक्त केली चिंता; म्हणाले, “जे खटले १० महिन्यांपेक्षा जास्त…”

नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालायच्या न्यायदेवतेवरती आमचा संपूर्ण विश्वास आहे. सर्व बाजू समजून घेऊन न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे, त्याबद्दल आम्ही मनापासून आभारी आहोत. या याचिकेत जे मुद्दे आहेत, त्यामध्ये दिसतं की महापालिकेकडे अर्ज करून २१ तारखेपर्यंत काही झालं नाही. त्यानंतर आम्ही न्यायालयात धाव घेतली होती. याचबरोबर अनेक वर्षे शिवसेनेचा हा विजयादशमी मेळावा शिवतीर्थावर होतो. कधीही असे कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न तयार झालेले नव्हते. किंबहून या सगळ्या ज्या बाजू आहेत, त्या तपासून पाहिल्यानंतर त्यांनी हे देखील स्पष्ट केलं आहे की, ज्यांनी सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित विषयावर आम्ही भाष्य करत नाही. परंतु आतापर्यंत असणाऱ्या प्रथा परंपरांमध्ये अनेक वर्षांपासून एक मैदान एक नेता या भूमिकेतून शिवसेनचं असणारं सातत्य आणि आम्ही नियमाप्रमाणे अर्ज केलेला आहे. त्याचा विचार करून त्यानुसार उच्च न्यायालयाने अत्यंत निरपेक्षपणे निर्णय दिलेला आहे आम्ही त्यांचे आभारी आहोत.”

याचबरोबर “विजयादशमीच्या संदर्भात आम्हाला जी आशा होती, जी अपेक्षा होती ती न्यायालयाने पूर्ण केलेली आहे. सर्व देवदैवतांना आम्ही वंदन करतो आणि योग्य तो निर्णय झाला त्याबद्दल न्यायालयाचे आभार मानून, न्यायालयाच्या सर्व निर्देशांचे पालन होईल याची आम्ही खात्री देऊ इच्छितो.” असंही गोऱ्हे यांनी यावेळी सांगितलं.

शिंदे गटाची याचिका फेटाळली जाताच खासदार विनायक राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

तर “न्यायदेवतेचे आम्ही मनापासून आभारी आहोतच, सत्याचा विजय न्यायालयात झालेला आहे. पहिल्यापासूनच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे ठामपणे सागंत होते, की आमचा न्याय देवतेवर विश्वास आहे. दसरा मेळावा शिवतीर्थावरच साजरा करण्यास आम्हाला परवानगी मिळेल, अशी खात्री होती, आत्मविश्वास होता. आज हा आमचा आत्मविश्वास खरा ठरलेला आहे. पुन्हा एकदा मी न्यायदेवतेचे आभार मानतो.” असं खासदार विनायक राऊत म्हणाले आहेत.